श्रीगोंदा नगरपालिका : नगराध्यक्षपदावर काँग्रेसच्या पोटे आघाडीवर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –  राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीच्या शुभांगी पोटे आघाडीवर आहेत. तसेच नगरसेवकपदाच्या 6 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्या आहेत.

नगरसेवक पदाच्या 6 जागा यांचे निकाल जाहीर आहेत. तीन जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, तर तीन जागांवर भाजप विजयी झाली आहे. आत्तापर्यंत झालेल्या मतमोजणीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार शुभांगी पोटे या 644 मतांनी आघाडीवर आहेत.

नगरसेवक पदावर विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे:

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : सतीश मखरे, राजभाऊ लोखंडे  गणेश भोस.

भाजप : सुनीता खेतमाळीस, दीपाली औटी, घोडेक संग्राम