Post_Banner_Top

श्रीगोंदा पंचायत समिती सभापती, उपसभापतींचा राजीनामा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे या दोघांनी आज दुपारी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले. त्यांच्या जागेवर महेश हिरवे व मनिषा कोठारी यांची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

श्रीगोंदा पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या आदेशावरून पंचायत समितीचे विद्यमान सभापती पुरुषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज सदस्यांच्या बैठकीत दिला. आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित लक्षात घेऊन पाचपुते यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला होता. त्यांच्या जागेवर हिरवे व उपसभापती पदासाठी कोठारी यांची वर्णी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पाचपुते यांनी ही खांदेपालट केली आहे, असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याने अण्णासाहेब शेलार यांची जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसने हकालपट्टी केली होती. ते सभापती पदासाठी इच्छुक होते. परंतु, श्रीगोंदा तालुक्यात ते पाचपुते यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. त्यामुळे शेलार यांची इच्छाशक्ती अपूर्ण राहिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘Sponk’ आहे गुडघ्याचा दुर्मिळ आजार, वेळीच निदान होणे गरजेचे

आता एन्डोस्कोपीद्वारे वजन कमी करता येणार

जपानचा ताप महाराष्ट्राच्या माथी

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात

Loading...
You might also like