प्रेम प्रकरणातून विद्यार्थ्याची आत्महत्या ; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून युवकाने ८ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी सखोल चौकशीनंतर तब्बल दोन महिन्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डा येथे ही घटना घडली होती.

अजित संजय गायकवाड (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मुलाचे वडील संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बांगर्डा गावातील अंकुश बास्कू गायकवाड, आदिका अंकुश गायकवाड, अमोल तेजमल कदम, राजू तात्याबा शेळके, सोमनाथ अंबादास गायकवाड, किरण संभाजी गायकवाड, तुषार संभाजी गायकवाड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. ८ एप्रिल रोजी श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डा येथील १ विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. तब्बल दोन महिन्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अजित हा घोगरगाव छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे बारावीला विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. यातील एका आरोपीच्या मुलीशी अजित याचे प्रेमप्रकरण होते.

त्या कारणातून मुलीचे वडील-आई व इतर नातेवाइकांनी अजित गायकवाड याला दमदाटी केली. १८ एप्रिल रोजी अजित गावात जातो असे सांगून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो परत न आल्याने वडील व इतर नातेवाइकांनी त्याचा शोध घेतल्यानंतर शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. प्रेमप्रकरणातून मुलाला त्रास देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सिनेजगत

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’