एकाकडे 20 तर दुसऱ्याकडे 145 ‘पदव्या’, तरीही वाटते गणिताची भीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  डॉ. श्रीकांत जिचकर यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भारताची ‘सर्वाधिक योग्य व्यक्ती’ म्हणून नोंदले गेले आहे. त्यांच्याकडे २ किंवा ४ नाही तर २० डिग्री होत्या. आजच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु तुम्हाला माहिती आहे काय की श्रीकांत यांच्याशिवाय एक अशी व्यक्ती देखील आहे, ज्याच्याकडे १४५ डिग्री आहेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…

कोण होते डॉ. श्रीकांत जिचकर?

श्रीकांत जिचकर यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५४ रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांचे निधन २ जून २००४ रोजी झाले होते.

श्रीकांत जिचकार यांनी अनेक विषयांमध्ये एम.ए (मास्टर्स) केले होते. त्यांनी पत्रकारिते व्यतिरिक्त एमबीए आणि बिजनेस स्टडी मध्ये डिप्लोमा केला होता. तसेच त्यांनी डी.लिट आणि इंटरनॅशनल लॉ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले होते.

त्यांना डॉक्टर पीएचडीमुळे नव्हे तर एमबीबीएस आणि एमडीमुळे म्हणत होते. ते इतके हुशार होते की, १९७८ मध्ये आयपीएस आणि १९८० मध्ये आयएएस म्हणूनही निवडून आले होते.

१९७३ ते १९९० या काळात श्रीकांत जिचकर यांनी ४२ विद्यापीठ परीक्षांमध्ये भाग घेतला आणि २० मध्ये उत्तीर्ण झाले होते. ते बर्‍याच परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आणि अनेक सुवर्णपदकेही जिंकली होती.

लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार ते भारतातील सर्वात पात्र व्यक्ती आहेत. २ जून २००४ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी कार अपघातात त्यांचे निधन झाले होते.

कोण आहे १४५ पदव्या असलेली व्यक्ती?

जाणून घेऊया चेन्नईचे प्रोफेसर व्ही.एन. पार्थीबन, ज्यांचे व्हिजिटिंग कार्ड एखाद्या पुस्तकासारखे आहे. कदाचित कोणालाही विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे की त्यांच्याकडे १४५ पदव्या आहेत.

त्यांच्या डिग्रीची यादी बघून अनेकांना चक्कर येईल. या आहेत त्यांच्या पदव्या…
१२ रिसर्च डिग्री (एमफिल)
८ मास्टर ऑफ लॉ डिग्री (एमएल)
१० एम.ए, ८ एम.कॉम
३ एम.एस.सी
९ एम.बी.ए डिग्री

चेन्नईतील अनेक महाविद्यालयात १०० पेक्षा जास्त विषय शिकवतात. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, “मला अभ्यासाचा खरोखर आनंद होतो, हे मला अजिबात अवघड वाटत नाही.”

प्रोफेसर व्ही.एन. पार्थीबन चेन्नईमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत आणि त्यांच्या काळात महाविद्यालयात जाणे सोपे नव्हते. ते म्हणाले, अयशस्वी होणे हा आतापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे.

“मी माझी पहिली महाविद्यालयीन पदवी पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट केले आणि न्यायपालिका विभागात नोकरीही मिळवली. त्यानंतर अनेक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास सुरवात केली होती. काही वेळेला असेही झाले की, मी चुकीच्या विषयासाठी अभ्यास केला आहे आणि पेपरमध्ये नापास झालो.”

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इतक्या पदव्या घेतलेल्या व्यक्तीला गणिताचा फोबिया आहे. म्हणजेच त्यांना गणिताची भीती वाटते. त्यांनी सांगितले होते की, एकदा Actuarial Sciences साठी अर्ज केला होता, पण गणितामुळे ते तो पूर्ण करू शकले नाहीत.

जरी त्यांच्याकडे १४५ पदव्या आहेत, तरीही त्यांना लोकांचे चेहरे लक्षात ठेवणे कठीण वाटते. ते दररोज ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणाची दिशाही विसरून जातात. त्यांना आता शिकायचे आहे आणि आणखी पदव्या मिळवायच्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like