श्रीकांत पाडुळे आता पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक

सोलापूर: पोलीसनामा ऑनलाईन

श्रीकांत पाडुळे यांची जिल्हा नियंत्रण कक्षातून पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी या बदलीचा आदेश काढला आहे. पंढरपूरचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांची बदली न केल्याने नवनियुक्त पीआय पाडुळे हे आता अतिरिक्त पोलीस निरीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतील.

मागील काही दिवसांपासून पंढरपूरची कायदा सुव्यवस्था कोलमडल्याने सध्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांचा कार्यकाळ काही महिन्यात संपणार असल्याने नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे हे अतिरिक्त पोलीस निरीक्षक म्हणून आपला पदभार सांभाळणार आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पंढरपूर पोलीस मजबूत करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार पाडुळे यांची नेमणूक असल्याचे दिसून येते. 1 मे पासून नूतन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे सुरू होणार असल्यामुळे तसेच संख्याबळ वाढवल्याने पंढरपूर शहर आणि तालुक्यातील पोलीस बळ चांगलेच मजबूत झाल्याचे दिसत आहे.