Shrikant Shinde | ‘दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’ सारखा, हा… ‘, अजित पवारांच्या ‘शो मॅन राज कपूर’ टीकेला श्रीकांत शिंदे यांचा टोला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात आरोप प्रत्यारोपांची चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. विकासाच्या मुद्यावरुन आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका करण्याची अजित पवार एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अजित पवारांच्या टीकेला आता मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’ सारखा, हा ‘शो’ले आहे’ असं म्हणत श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

 

काय म्हणाले अजित पवार?
गणपतीच्या दर्शनाला आम्हीही जातो. पण कधी कॅमेरामॅन घेऊन जात नाही. पण, आता असे कॅमेरे लावले जातात, बरोबर गाडी थांबते, बरोबर कुणी तरी उतरतो, मग एंट्री होते. कशाला या सगळ्या गोष्टी पाहिजेत. तुमचं तुमच्याकडे ठेवा. गणेशभक्तांनी देखावे ठेवायचे असतात. आता काय तर शो करायची सवय लागली आहे. राज कपूर (Raj Kapoor) हे शोमॅन होते, तशी सवय काही लोकांना लागली आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.

 

 

श्रीकांत शिंदेचा अजित पवारांना टोला
श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ट्विट करुन अजित पवार यांच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा…हा ‘शो’ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा !
आणि हो… हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली ?…पिक्चर अभी बाकी है’ !!!
असे सूचक विधान ट्विटमधून केले आहे. तसेच #khatteangur असा हॅशटॅग वापरला आहे.

 

Web Title :- Shrikant Shinde | mp shrikanteknath shinde tweet on ajit pawar told cm shinde as a showman raj kapoor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘हम जेल काट के आय है’ म्हणत गुंडांनी माजविली दहशत ! शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटमध्ये दोन गटात राडा

 

Pune Crime | मोबाईलचा गैरवापर करुन दुकानदाराने घातला व्यावसायिकाला 12 लाखांना गंडा; उत्तमनगर पोलीस ठाण्यात FIR

 

Ghulam Nabi Azad | गुलाम नबी आझाद नव्या पक्षाची स्थापना करणार?