Shrikant Shinde On Sanjay Raut | ईडीच्या नोटीसनंतर खा. श्रीकांत शिंदेंचा टोला; म्हणाले – ‘संजय राऊतांना ED समन्स बद्दल हार्दिक शुभेच्छा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shrikant Shinde On Sanjay Raut | एकीकडे राज्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला (Shivsena) आणखी धक्का बसला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) समन्स बजावण्यात आले आहे. उद्या मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी (Patrachal Land Scam Case) राऊत यांना समन्स बजावले आहे. यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी (MP Shrikant Shinde) राऊतांवर निशाणा साधला आहे.

 

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, “संजय राऊत यांना ईडीच्या समन्सबद्दल माझ्या शुभेच्छा. एकनाथ शिंदे यांचा गट अपात्रतेबाबत न्यायालयीन लढाई जिंकेल,” असं ते म्हणाले. दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या विधानामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.

 

दरम्यान, एप्रिलमध्ये ईडीकडून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) आणि 2 सहकार्‍यांची 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली होती.
संजय राऊत यांना पाठवण्यात आलेल्या समन्सवर शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले आहेत.
ईडीने भाजपाच्या भक्तीचे उदाहरण दिले आहे. त्यानुसार त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.
असं शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?
“मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान.. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत.
आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.
माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा!’ जय महाराष्ट्र! @Dev_Fadnavis, असं ट्विट करत त्यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य केलं आहे.

 

Web Title :- Shrikant Shinde On Sanjay Raut | my best wishes to sanjay raut on ed summons says thane mp shrikant eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | रोज 50 रुपये जमा करून एकदाच मिळवा 35 लाख, स्कीमबाबत जाणून घ्या सविस्तर

 

Deepak Kesarkar On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना मतदान देऊन चूक झाली, त्यांनी राजीनामा द्यावा’ – दीपक केसरकर

 

Pune Crime | माल खरेदी करुन पैसे एटीएममधून काढून देण्याचा बहाणा करुन पळून जाणाऱ्या चोरट्याला पकडले