श्रीलंकेत झालेल्या बाॅम्बस्फोटत भारतातील ३ जणांचा मृत्यू

कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटात २१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृत झालेल्यांमध्ये ३५ विदेशी पर्य़टकांचा समावेश असून मृतांमध्ये भारतातील तीघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. लोकशीणी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश (संपूर्ण नाव समजू शकले नाही) या भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे भारतातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर श्रीलंका सरकारने श्रीलंकेत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा जगभरातून निषेध केला जात आहे.

साखळी स्फोटानंतर श्रीलंका सरकारने फेसबुक, ट्विटर असे सोशल मीडिया काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रॉयटर्स इंडिया या वृत्तसंस्थेने दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये एकूण ८ बॉम्बस्फोट झाले. यात २१५ ठार झाले असून, ४०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.