श्रीमद्भगवद्गीता ! भोजन पदार्थांच्या ‘आवडी’नुसार ओळखा तुमचा ‘गुण’ (सात्विक, राजस, तामस), जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –

आयु: सत्त्वबलारोग्य–
सुखप्रीतिविवर्धना:।
रस्या: स्निग्धा: स्थिरा हृद्या–
आहारा: सात्त्विकप्रिया: ।।१७-८।।
कटवम्ललवणात्युश्नतीक्ष्णरुक्षविदाहिन: ।
आहारा राजसस्येषटा दुखशोकामयप्रदा: ।।१७-९।।
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत ।
उच्छिष्टमपि चामेध्यम् भोजनं तामसप्रियम् ।।१७-१०।। (भगवद्गीता, श्रद्धात्रयविभागयोग)

भगवद्गीतामध्ये सांगितल्यानुसार आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्त्विक पुरुषांना प्रिय असतात.

कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते ते भोजन तामसी लोकांना आवडते.

रसयुक्त, सत्त्वयुक्त, स्निग्ध, मधुर, भोजन सात्त्विक असते. कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, कोरडे, भोजन राजस असते. कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे, उष्टे भोजन तामस असते.

लेखक :- श्री दिलीप अंबिके