Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल – पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभुमी असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि संग्रहालयाच्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) माध्यमातून आपल्या क्रांतिकारकांनी केलेली कामगिरी नव्या पिढीला कळेल. तसेच हे भवन एक पर्यटन स्थळही म्हणून ओळखले जाईल, असे गौरवोद्गार पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी काढले.

 

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ द्वारे (Indrani Balan Foundation) नुतनीकरण करण्यात आलेल्या हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपतीच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन व संग्रहालयाचे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati ) उद्घाटन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिध्द ब्लॉगर व शेफ जुगनू गुप्ता (Famous Blogger and Chef Jugnu Gupta), मंडळाचे उत्सव प्रमुख, विश्वस्त व युवा उद्योजक पुनीत बालन (Young entrepreneur Punit Balan), मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, आरएमडी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन (RMD Foundation President Janhvi Dhariwal-Balan), उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल (Shobhatai Dhariwal) यांच्यासह मानाच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी गुप्ता यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची सपत्नीक आरती करण्यात आली. त्यानंतर नुतनीकरण करण्यात आलेल्या भवनाचे व संग्रहालयाचे उद्घाटन झाले. यावेळी कलश, शाल व श्रीफळ देऊन गुप्ता दांपत्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गुप्ता म्हणाले, वर्षभरापूर्वी मी हे भवन पाहिले होते, आता नुतनीकरणानंतर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ अशी ही वास्तु झाली आहे.
जेव्हा पर्यटक शनिवारवाडा व इतर गोष्टी पाहण्यासाठी पुण्यात येतील, तेव्हा हे भवनही पहायला नक्की येतील.
हे पण एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाईल.
आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा जो इतिहास आहे आणि क्रांतिकारकांनी जी काही कामगिरी केली हे नव्या पिढीला या माध्यमातून कळणार आहे.
धार्मिक, ऐतिहासिक आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभुमी असलेल्या या भवनाचे नुतनीकरण केल्याबद्दल पुनीत व जान्हवी बालन आणि ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले.
तसेच असेच चांगले सामाजिक काम आपल्याकडून होईल अशी अपेक्षाही गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली.

 

देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक आदी क्रांतिकारकांनी केलेली चळवळ या भवनातून सुरू केली होती.
जवळपास १४० वर्षे जुने असलेले हे भवन नुतनीकरण करण्याची गरज होती.
त्यानुसार ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ ने पुढाकार घेऊन ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’ समवेत या भवनाचे नुतनीकरण केले,
याचे समाधान आहे.

पुनीत बालन (उत्सव प्रमुख व विश्वस्त)

 

 काय आहे या भवनात नक्की

क्रांतिकारकांचे माहेरघर असलेल्या या भवनात गुप्त दालन, भुयारी रस्ते, ब्रिटीशकालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्रे,
‘ईस्ट इंडीया कंपनी’ ची पेटी व वाड्याला असलेली सेंट्रल लॉकिंग सिस्टीम इत्यादी आकर्षणांबरोबरच पर्यटकांसाठी ऑडिओ व व्हिडिओ क्लिपही असणार असून हे भवन सर्वांसाठी विनाशुल्क खुले असणार आहे.

 

Web Title : – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | The new generation will know the achievements of revolutionaries from Shrimant Bhausaheb Rangari Bhawan Commissioner of Police Abhithabh Gupta

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा