Shrimant Dagdusheth Ganpati Trust | दुकाने आणि हॉटेल्स सुरु होतात मग मंदिरे का नाही, श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचा सरकारला सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन नियमावली (New regulation) जाहीर करुन निर्बंधामध्ये बदल केले आहेत. नव्या नियमानुसार दुकाने (Shops) आणि हॉटेल्स (hotels) सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, मंदिरे खुली (Temples open) करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. हॉटेल आणि दुकाने सुरु होतात तर मंदिराबाबत दुजाभाव का, असा सवाल पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने (Shrimant Dagdusheth Ganpati Trust) केला आहे. सरकारने मंदिरे तातडीने खुली करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या (Shrimant Dagdusheth Ganpati Trust) वतीने करण्यात आली आहे.

राज्य सरकारने सोमवारी कोरोना निर्बंधासंदर्भात (corona restriction) नवीन नियमावली जारी केली. नव्या नियमावलीनुसार राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयावर व्यपारी व अध्यात्मिक वर्तुळात नाराजी असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील मंदिरे तातडीने खुली करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने केली आहे. दरम्यान, सकाळी 6 ते 11 या कालावधीत मंदिरे सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी अपेक्षा देखील ट्रस्टने व्यक्त केली आहे.

शहरातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढीचा दर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
अशा शहरात वीकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown) रद्द करावा.
दुकानांची दैनंदिन वेळ रात्री 8 पर्यंत करावी, आदी मागण्या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.
या मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
परंतु राज्य सरकारने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा पुणे जिल्ह्याचा (Pune district) एक घटक म्हणून केला आहे.
त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना नव्या नियमानुसार दिलासा मिळालेला नाही.

Web Title :- shrimant dagdusheth ganpati trust seeks permission to open temples

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime | फेक कॉल केल्याच्या रागातून पोलिसांची तरुणाला मारहाण, अपमानित झालेल्या तरुणाची आत्महत्या

Gold price today | येत्या काळात सोन्याचा भाव तब्बल 90 हजारांवर जाणार? जाणून घ्या

Sangola Accident | सांगोला तालुक्यात ट्रक-कारचा भीषण अपघात; कार चालकासह 2 लहान मुलींचा मृत्यू