देश तोडायचाच असता तर हिंदुस्थान राहिलाच नसता : फारूक अब्दुल्ला

श्रीनगर : वृत्तसंस्था – कलम ३७० रद्द केले तर जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळा होईल अशी धमकी देणाऱ्या जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती व जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारुख अब्दुल्लांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ‘देश तोडायचाच असता तर हा हिंदुस्थान राहिलाच नसता असे विधान फारूक अब्दुल्ला यांनी केले आहे.

फारूक अब्दुल्ला मोदींना उद्देशून म्हणाले की, ‘तुम्ही म्हणता की अब्दुल्ला देशाचं विभाजन करायला करायला निघाले आहेत. आम्हाला जर देश तोडायचा असता तर हिंदुस्थान शिल्लक राहिलाच नसता. आमचा पक्ष लोकांचे भले करण्यासाठी लढतो. मग ते मुस्लीम असो, हिंदू असो, शीख असो की ख्रिश्चन… आम्ही भलाईसाठी लढतो. मोदी यांनी पूर्ण ताकद लावली तरी ते हिंदुस्थान तोडू शकणार नाहीत. आमच्या कुटुंबीयांबद्दल काहीही बोललात तरी आम्ही डगमगणार नाही.१९९६ साली कुणीही निवडणूक लढण्यासाठी तयार नव्हते तेव्हा आम्ही धीराने निवडणूक लढलो. जनता कष्टातून बाहेर यावी असे मला वाटत होते. मोदींनी हे कधी विसरता कामा नये.’

काय म्हणाले होते मोदी –

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे पहिली प्रचारसभा घेतली. त्यावेळी काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांवर टीका करताना मोदी म्हणाले होते की, ‘अब्दुल्ला, मुफ्ती कुटुंबीयांनी जम्मू कश्मीरच्या तीन पिढ्यांचे आयुष्य बर्बाद केले आहे. त्यामुळे आता कश्मीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दोन कुटुंबांना इथून बाहेर काढायला हवा. ते मोदींविरोधात लढण्यासाठी त्यांच्या संपूर्ण टीमला आणतील. मोदींची हवी तितकी बदनामी करतील. मात्र मी त्यांना देशाचे विभाजन करु देणार नाही.’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp chat