संजय राऊतांच्या ‘स्टेपनी’च्या वक्तव्यावर अजित पवारांचे बंधू भडकले, दिलं हे ‘प्रत्युत्तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची काल पुण्यात एका कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तर आपल्या उत्तरामधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला होता. तसेच यावेळी त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर देखील निशाणा साधला.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख ‘स्टेपनी’ असा केला होता. स्टेपनी ही गाडीसाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याला अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्यांनी ‘विनाष काले विपरीत बुद्धी (संजय राऊत)’ असे लिहले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन केल्यावर आम्हाला फार काही वाटले नाही. हा फुसका बार आहे हे माहित होते. आमच्या गाडीचं चाक नाही, तर ते आमची ‘स्टेपनी’ घेऊन गेले होते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. संजय राऊत यांनी अजित पवार यांचा स्टेपनी हा केलेला उल्लेख श्रीनिवास पवार यांना खटकल्याने त्यांनी सूचक पोस्ट केल्याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/