शिवसेनेच्या मारहाणी नंतर श्रीपाद छिंदमची प्रतिक्रिया ; काय म्हणाला छिंदम वाचा 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीपाद छिंदमने शिवसेनेच्या उमेदवारांनी मला फोन करून मतदान करण्यास सांगितले होते असा गोप्यस्फोट करत लगेच त्या फोन वरील संवादाची क्लिप माध्यमांच्या प्रतिनीधींना दिली. आपणाला शिवसेनेच्या उमेदवारानेच मतदान देण्यासाठी सांगितले होते असे म्हणल्या नंतर शिवसेनेची चांगलीच धांदल उडाली आहे. आपणाला सभागृहात मारहाण करून शिवसेना निवडणुकीच्या रणांगणातून पळून का गेली असा सवाल हि त्याने शिवसेनेच्या नगरसेवकांना विचारला आहे.

आज शुक्रवारी नगरच्या महानगर पालिकेची महापौर आणि उपमहापौर निवड होती. निवडीच्या दरम्यान शिवसेनेच्या गट नेत्यांनी छिंदमचे मत आम्हाला नको आहे. तरी छिंदम आम्हाला मतदान देतो आहे याने आम्हाला मतदान केले तर त्याचे मतदान गृहीत धरू नये असे पत्रच निवडणूक पीठासीन अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानंतर  सभागृहात मतदान सुरु झाले असता सर्वप्रथम भाजप उमेदवारांच्या बाजूची मते निवडणूक अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान घेण्यात आले तेव्हा छिंदमने हात वर करताच शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी छिंदमला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वच शिवसैनिकांनी छिंदमला मारहाण करून त्या ठिकाणाहून शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. शिवसेनेचे नगरसेवक उपमहापौराची निवड होण्या अगोदरच सभागृहातून निघून गेल्यामुळे उपमहापौर पदी भाजपच्या मालन ठोणे यांची ३७-० अशा मतांनी निवड झाली आहे.

मारहाणीच्या नंतर सभागृहाच्या बाहेर आलेल्या छिंदमने लगेच पत्रकार परिषदेला आमंत्रित करून त्याच्याशी संवाद साधला. शिवसेनेच्या नेत्यांवर कडक शब्दात टीका करून शिवसेनेने रणांगण का सोडले असा सवाल छिंदम याने केला. तर आपण शिवसेनेच्या नगरसेवकांवर पोलीसात जाऊन गुन्हा दाखल करत आहे असे छिंदमने म्हणले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द काढल्या नंतर छिंदमचे राजकारण संपुष्ठात आले आहे. छिंदमला कोणत्याच पक्षाने उमेदवारी नदिल्याने त्याने अपक्ष उमेदवारी दाखल केली. छिंदम पालिकेची निवडणूक जिंकला. त्यानंतर आज तो  त्याचा मतदानाचा अधिकार बजवण्यासाठी सभागृहात आला असता हा प्रकार घडला आहे.