Shripad Chhindam Arrest | शिवरायांचा अवमान करणार्‍या श्रीपाद छिंदमला भावासह अटक, जाणून घ्या प्रकरण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  Shripad Chhindam Arrest | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam Arrest) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम (Srikanth Chhindam) या दोघांना आता पोलिसांनी अटक (Arrested) केल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांआगोदर एका टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. त्यामुऴे त्या दोघांना तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police Station) अटक केली आहे. अशी माहिती तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी (PI Jyoti Gadkari) यांनी दिली आहे.

गुन्हा घडल्यापासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, ते आढळून आले नाही.
काल रात्री ते नगर शहरात आल्याची माहिती आम्हाला मिळाली, त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
सध्या दोघांनाच अटक केली असून त्यांच्या अन्य साथिदारांचा शोध सुरू आहे.
असं तोफखाना पोलीस ठाण्याच्या पीआय ज्योती गडकरी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दिल्लीगेट येथील येथे ज्युसचे दुकान चालविणारे भागीरथ भानुदास बोडखे (Bhagirath Bhanudas Bodkhe) (वय 52 रा. नालेगाव) यांनी श्रीपाद छिंदम आणि त्याच्या भावासह 30 ते 40 जणांविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे.

अधिक माहितीनुसार, 9 जुलै रोजी दुपारी हे सर्व आरोपी दिल्लीगेट येथे आले.
भागीरथ बोडखे त्यांच्या ज्यूस सेंटरमध्ये काम करत होते. श्रीकांत व श्रीपाद छिंदम यांच्यासह जमावाने जेसीबी व क्रेन घेऊन तेथे आले होते. त्यांनी बोडखे यांना शिवीगाळ केली.
ज्यूस सेंटरमधील सामानांची फेकाफेक केली. श्रीपाद याने ही जागा आपण घेतली असून ती माझ्या ताब्यात दे, असे म्हणून सामानाची फेकाफेक सुरू केली. धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळही केली.
टपरीमधील सामान फेकून देत गल्ल्यातील 30 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली.
आरोपींनी बोडखे यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून बाजूला केली, असे फिर्यादीत म्हटलं आहे.

 

दरम्यान, पूर्वी शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर भाजपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती.
या गुन्ह्यात त्याला अटक झाली, त्याचे नगरसेवक पद गेले.
तो दुसऱ्यांदा निवडून आला, तेही पद रद्द करण्यात आले आहे.
या दरम्यान, आताच्या प्रकरणामध्ये गुन्हा घडल्यापासून जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात ते फरार होते.
अखेर रात्री तोफखाना पोलिसांनी त्यांना अटक (Arrested) केली आहे.

 

Web Title : Shripad Chhindam Arrest | ahmednagar shripad chindam and brother booked for police station ahmednagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Navale Bridge Accident | दुर्देवी ! पुण्यातील नवले ब्रीजवर टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, नात जखमी

Javed Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच’, BJP आरएसएससंबंधी ‘त्या’ वादावर ‘जावेद अख्तर’ याचं रोखठोक मत, म्हणाले…

Maharashtra ATS | मुंबईत एकही दशतवादी आला नाही, राज्यात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत – एटीएस प्रमुख विनित अग्रवाल