श्रीपाद छिंदम छत्रपतींसमोर नतमस्तक,म्हणाला …महापुरुषांच्या आशीर्वादानेच झालो विजयी

अहमदनगर :पोलिसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजां विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केललेला श्रीपाद छिंदम अखेर मंगळवारी छत्रपतींसमोर नतमस्तक झालाआहे. महापलिका निवडणुकीत २१०० मतांनी विजय मिळाल्यानंतर श्रीपाद छिंदम मंगळवारी नगरमध्ये आला त्याने आपल्या कार्यालया असलेल्या शिवाजी महाराज तासेच डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़ आणि म्हणाला या सर्व महापुरुषांच्या आशीर्वादानेच मी महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालो आहे .

अहमदनगर महापालिका निवडणुकीत छिंदमने प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्याने निवडणुकीत विजयही प्राप्त केला. विजय प्राप्तीनंतर देखील प्रसारमाध्यमांनी त्याने केलेल्या वक्तव्याची जाणीव पुन्हा सर्वांना करून दिली होती त्यावर अनेक चारच्या देखील झाल्या होत्या. निवडणूक काळात तर प्रशासनाने छिंदमला शहरातून हद्दपार देखील केले होते. सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर जेंव्हा मंगळवारी छिंदम नगर मध्ये दाखल झाला नगर मध्ये येताच त्याने त्याच्या दिल्लीगेट येथील कार्यालयात जाऊन प्रथम महापुरूषांना अभिवादन केले़.

आणि यावेळी बोलताना छिंदम म्हणाला, निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता आले नाही. मात्र, जनतेने मला निवडून दिले. हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे वयक्तिक माझा नाही. जिल्हा बंदीची मुदत संपल्यानंतर नगर शहरात आलो. या ठिकाणी मात्र कुणाचाही सत्कार न घेता प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरूषांना अभिवादन करून नतमतस्क झालो. या महापुरुषांच्या आशीर्वादानेच मला हा विजय मिळाला. आता, प्रभागातील मतदार बंधू-भगिनींच्या भेटी घेऊन त्यांचे आभार मानणार आहे.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे. पहिल्या फेऱ्यांत पिछाडीवर असणाऱ्या श्रीपाद छिंदमने नंतर आघाडी घेतली, ती आघाडी शेवटपर्यंत राखत त्याने अखेर विजय मिळविला. त्यानंतर प्रथमच तो नगरमध्ये दाखल झाला.