नगरमध्ये श्रीपाद छिंदमला ‘या’ पक्षानं दिली उमेदवारी !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा व त्यानंतरही महापालिका निवडणुकीत विजय झालेला श्रीपाद छिंदम याला बहुजन समाज पक्षाच्यावतीने उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज सकाळी 11 वाजता तो पक्षाच्या ‘एबी फॉर्म’सह उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर अहमदनगर महापालिकेचा तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम हा चांगलाच अडचणीत आला होता. त्याच्याबद्दल राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर अहमदनगर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरला व त्याने बाजी मारली. नगरसेवक म्हणून कोणत्याही पक्षाची उमेदवारी न करता अपक्ष म्हणून त्याने बाजी मारली. आता विधानसभा निवडणुकीतही तो नशीब आजमावणार आहे.

काल रात्री उशिरा बहुजन समाज पक्षाच्यावतीने त्याला एबी फॉर्म देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तो आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समजली आहे. श्रीपाद छिंदम याची उमेदवारी अनिल राठोड की आ. संग्राम जगताप यांना त्रासदायक ठरणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

visit : Policenama.com