अहमदनगर : श्रीपाद छिंदम विधानसभेच्या आखाड्यात !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा व त्यानंतरही महापालिका निवडणुकीत विजय झालेला श्रीपाद छिंदम हा विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. त्याने आज उमेदवारी अर्ज घेतला आहे. छिंदम याची उमेदवारी कोणाला त्रासदायक ठरणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर अहमदनगर महापालिकेचा तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम हा चांगलाच अडचणीत आला होता. त्याच्याबद्दल राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर अहमदनगर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरला व त्याने बाजी मारली. नगरसेवक म्हणून कोणत्याही पक्षाची उमेदवारी न करता अपक्ष म्हणून त्याने बाजी मारली. आता विधानसभा निवडणुकीतही तो नशीब आजमावणार आहे. त्याने आज नगर तहसील कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतला आहे. तो निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

श्रीपाद छिंदम याची उमेदवारी अनिल राठोड की आ. संग्राम जगताप यांना त्रासदायक ठरणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Visit : policenama.com

You might also like