ताज्या बातम्यापुणेराजकीय

काँग्रेस नेत्यांच्या त्यागाने देश स्वतंत्र : श्रीपाल सबनीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कॉंग्रेस नेत्यांच्या त्यागाने आज देश स्वतंत्र झाला हे विसरता येणार नाही. आज कार्यकर्त्यांनी त्याची गंभीर दाखल घेऊन पुन्हा कॉंग्रेसचा जीर्णोद्धार करावा असे आवाहन श्रीपाल सबनीस यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना एका कार्यक्रमाप्रसंगी केले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या ७५व्या जयंती निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे काल आज आणि उद्या याविषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७५ कार्यरत संस्था व मंडळाचा जाहीर सन्मान कार्यक्रम मेमोरियल हॉल येथे संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, तिन्ही गांधींच्या परमोच्च त्यागाने देशात कॉंग्रेस सक्रीय राहिली. देशासाठी महात्मा गांधीने अहिंसा मार्गाने लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार पटेल यांचे कार्य कॉंग्रेसला अत्यंत मोलाचे ठरले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थाना विलीन करून अखंड भारत उभा केला. नेहरूंनी स्वातंत्र्य प्राप्ती नंतर दूरदृष्टी ठेवून विधायक कार्याने देश विकासाकडे साधला. तसेच इंदिरा गांधी यांनी आपल्या बलशाली दृष्टीकोनातून देश सुजलाम सुफलाम करण्याचे कार्य केले. शेवटी राजीव गांधी यांनी संगणक आणून देशाला तंत्रज्ञानाकडे नेले. चले जाव चळवळ, ९ ऑगस्टचा क्रांती दिवस, १९३० चा मिठाचा सत्याग्रह, असहकारतेची चळवळ, खिलापत चळवळ, टिळकांचे योगदान, सुभाषचंद्राचे योगदान व एकूणच सबंध तुरुगांमध्ये जाणाऱ्या कॉंग्रेसची यादी काढा आणि भाजपच्या इतिहासाला प्रश्न विचारा कि तुमचे किती कार्यकर्ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुगांत गेले, असा सवाल उपस्थित करत सबनीस यांनी भाजपला धारेवर धरले.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सदानंद शेट्टी, उपमहापौर आबा बागुल व काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मुख्तार शेख यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर होते.

यावेळी सदानंद शेट्टी यांनी बोलताना सांगितले कि, कॉंग्रेस पक्षाकडे मोठ्या संख्येने जनशक्ती व हितचिंतकांचा ताफा आहे. आज देशाने जी प्रगती साधली आहे त्यामध्ये राजीव गांधी यांचा कार्याचा मोठा वाटा आहे. राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची सुरुवात केली व महिलांना प्रत्येक क्षेत्रात अधिकार दिले. कॅन्टोमेंट मतदार संघ हा कोस्मोपोलीटन व संमिश्र मतदार संघ असून कॉंग्रेसला मानणारा आहे. यासंघात पक्षाच्या माध्यमातून बरीच प्रगती साधली आहे. यावेळी आगामी निवडणुकीत पुन्हा कॉंग्रेस सत्तेत येईल असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या बळावर रमेश बागवे यांनी बोलवून दाखविला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष रमेश बागवे, गोपाळ तिवारी, नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी, लता राजगुरु, माजी महापौर रजनी त्रिभुवन, नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, भीमराव पाटोळे, देवकी शेट्टी, निता रजपुत, सारिका आगज्ञान, असलम बागवान, जयसिंह भोसले, बुवा नलावडे, सुजित यादव, अ‍ॅड रोहन शेट्टी, विठ्ठल गायकवाड, रविंद्र आरडे व समस्त कार्यकर्ते पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

बाळासाहेब शिवरकर
राज ठाकरे यांनी ज्या कारणास्तव आपले थोबाड उघडले ते कधीही बंद होणार नाही. विरोधकांच्या भ्रष्ट्राचार पाळेमुळे खणल्याशिवाय राहणार नाही. कॉंग्रेस हि राज ठाकरे यांच्या पाठीशी असून सक्रीय पाठिंबा व्यक्त करीत असल्याचे विधान शिवरकर यांनी यावेळी केले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Back to top button