श्रीरामपुरात गोळीबार ! पाच जण जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लहान मुलांच्या वादातून श्रीरामपूर शहरात बुधवारी सायंकाळी गोळीबार करण्यात आला. गोळीबारात तीन जण व पळताना दोन जण असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीरामपूर शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अंगणात खेळणार्‍या मुलांच्या वादातून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात असलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून श्रीरामपुरमधील हुसेननगर भागात गोळीबार करण्यात आला. यात तिघे जखमी झालेल्यांमध्ये शरीफ रशीद शेख, जमील रशीद शेख, फरीद रशीद शेख (सर्व रा. हुसेननगर, श्रीरामपूर), तर गोळीबार केल्यानंतर पळताना रस्त्यावर पडल्याने दोघे आरोपी जखमी झाले. शेख रफद शेख रशीद, सय्यद मुजीब सय्यद (रा. ओरंगाबाद) हे पळताना पडून जखमी झाले आहेत.

जखमींवर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्याच आरोपींनी गोळ्या झाडल्याची घटनास्थळी चर्चा होती.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like