‘लॉकडाऊन’मध्ये श्रिया पिळगावकरनं केलं खास फोटोशुट !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री श्रिया पिळगावकर सध्या आपल्या एका फोटोशुटमुळं चर्चेत आली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लॉकडाऊन असताना श्रियानं फोटोशुट कसं केलं तर हेही जाणून घ्या की, तिनं तिच्या घरातच फोटोशुट केलं आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात श्रिया घरातच कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अशात तिनं एक फोटोशुट केलं आहे ज्याची चर्चा सुरू आहे.

श्रियानं तिच्या इंस्टावरून तिच्या नव्या फोटोशुटमधील काही फोटो शेअर केले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं व्हाईट रंगाचा शॉर्ट वनपीस घातला आहे. यात श्रिया काहीशी हॉटही दिसत आहे आणि तेवढीच सुंदरही.

सध्या श्रियाचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. खास बात अशी की, चाहत्यानाही ही फोटोशुट आवडलं आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या या फोटोंवर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि तिचं कौतुक केलं आहे.

श्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीच तिनं मिर्झापूर या वेब सीरिमध्ये काम केलं आहे. याला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला. लवकरच ती हाथी मेरे साथा या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती दाक्षिणात्य सिनेमात पाऊल टाकणार आहे. यात तिची पत्रकाराची भूमिका असणार आहे. याशिवाय ती अभी तो पार्टी शुरू हुई है आणि गुरींदर चड्ढाचा ब्रिटीश पीरियड ड्रामा बीच हाऊस मध्येही दिसणार आहे. तिची हाऊस अरेस्ट ही वेब सीरिजही रिलीज झाली आहे. तिनं भांगडा पा ले या सिनेमातही काम केलं आहे. श्रियानं शाहरुखच्या फॅन या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता.