Shriya Saran | ‘दृश्यम फेम’ अभिनेत्रीच्या लूकने चाहते घायाळ; ट्रॅडिशनल लूक मध्ये दिसते सोज्वळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shriya Saran | अभिनेत्री श्रिया सरन आपल्या अभिनयाबरोबरच ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. श्रिया काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटात दिसून आली. आज श्रियाने तिच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. श्रिया सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती विविध लूक मधील फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. अलीकडेच श्रियाने नवीन फोटो शूट केले असून या मध्ये तिने पारंपारिक पेहरावा केल्याचे दिसत आहे. श्रियाचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (Shriya Saran)

श्रिया प्रत्येक लूक उत्तमरीत्या कॅरी करत असते. एवढेच नाही तर ती विविध भूमिका देखील उत्तमरीत्या साकारून प्रेक्षकांकडून वाहवाई करून घेत असते. श्रियानी नुकतेच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच स्टाईलिश दिसत आहे. या फोटोमध्ये श्रियाने पीच कलरची साडी आणि फुल स्लीव्हज ब्लाऊज कॅरी करत न्यूड मेकअप करत हेवी इयरिंग घातले आहेत. यावेळी तिने केसांचा बन करत एकापेक्षा एक पोजेस देत फोटोज शेअर केले आहेत. श्रियाच्या या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. तर तिच्या या नैसर्गिक सौंदर्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. (Shriya Saran)

श्रियानी आजवर दाक्षिणात्य चित्रपटापासून ते बॉलीवूड चित्रपटापर्यंत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. श्रियाने तामिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केले आहे. श्रियाचा जन्म हरिद्वार येथे 11 सप्टेंबर 1982 रोजी झाला. श्रिया सध्या 40 वर्षाची आहे. मात्र तिच्या फिटनेसमुळे ती खूपच यंग दिसत असते. श्रिया कथ्थक डांसर असून तिने 2001 साली आलेल्या ‘इश्तम’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली आहे. यानंतर श्रियाने रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रियाला चांगली प्रसिद्धी रजनीकांत यांच्या ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटातून मिळाली होती. त्यानंतर श्रिया दृश्यम चित्रपटात देखील झळकून आली. या चित्रपटामध्ये श्रियानी अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

 

Web Title :- Shriya Saran | bollywood drishyam fame actress shriya saran traditional look latest photoshoot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाची राजकारणात जोरदार एन्ट्री; मिळविला ‘या’ जागेवर विजय

Apla Pune Cyclothon | ‘आपलं पुणे सायक्लोथॉन’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सेलिब्रिटी प्रोमो राईडद्वारे मोठ्या उत्साहात घोषणा

Kiara Advani – Sidharth Malhotra | सिद्धार्थ-कियाराचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल; बॉलिवूड गाण्यांवर थिरकले कपल