Shriya Saran | डीप नेक ड्रेसमध्ये दृश्यम फेम अभिनेत्री श्रिया सरनचा कहर

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री श्रिया सरन (Shriya Saran) सध्या ‘दृश्यम’ या चित्रपटांमुळे चर्चेत आली आहे. श्रियानी आजवर तिच्या अभिनयाने घराघरात स्थान मिळवले आहे. अभिनेत्री चित्रपटातील भूमिकांसोबतच सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असते. श्रियानी नवे फोटोशूट केले असून तिच्या या फोटोमधील ग्लॅमरस लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. श्रियाच्या (Shriya Saran) या स्टायलिश लूकला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तर काहींनी ती कोणताही लूक उत्तमरीत्या कॅरी करू शकते असे म्हणत कमेंट देखील केले आहेत.

श्रिया सोशल मीडियावर देखील नेहमीच अ‍ॅक्टिव असते. श्रियानी शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने डीप नेक थाय हाय स्लीट ड्रेससोबतच हाय हिल्स कॅरी करत स्मोकी आय न्यूड मेकअप केला आहे. या फोटोमध्ये श्रिया खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. तर श्रियाच्या या लूकने चाहते घायाळ झाले आहेत. तर काहींनी तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे देखील कौतुक केले आहे. श्रियानी आजवर दाक्षिणात्य चित्रपटापासून ते बॉलीवूड पर्यंत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. श्रियानी तिच्या अभिनयाच्या जोरावर आज अनेक चाहते निर्माण केले आहेत.

श्रियानी तामिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये आजवर अभिनय केला आहे.
श्रियाने (Shriya Saran) 2001 मध्ये आलेल्या ‘इश्तम’ चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.
त्यानंतर तिने रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
तर 2007 साली आलेल्या ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटांमुळे तिला जास्त प्रसिद्धी मिळाली.
यानंतर तिने अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत.
श्रियाने काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसून आली.

 

Web Title :- Shriya Saran | bollywood shriya saran latest photoshoot drishyam fame actress see photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | जबरदस्तीने विवाह करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले 10 लाख; समर्थ पोलिस ठाण्यात सौरभ सुपेकर विरूध्द गुन्हा दाखल

Buldhana ACB Trap | साखरेच्या पोत्यासह मागितली होती ४ लाखांची लाच; १ लाखांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

Pune Bar Association Elections | पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे तर उपाध्यक्षपदी  अ‍ॅड. विश्वजीत पाटील आणि अ‍ॅड. जयश्री चौधरी – बीडकर विजयी

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Maharashtra Politics | अजित पवारांचा कट्टर समर्थक आमदार एकनाथ शिंदेच्या गळाला? गाडीतून केला प्रवास; राजकीय चर्चांना उधाण