Shruti Haasan B’day | एकेकाळी अभिनेत्री श्रुती हसन ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती; ‘या’ चुकीमुळे झाला नात्याचा शेवट

0
301
Shruti Haasan B'day | happy birthday shruti haasan do you know why actress brokeup with naga chaitnya
file photo

पोलीसनामा ऑनलाइन  : साऊथ सुपरस्टार कमल हसन यांची लेक आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसनने (Shruti Haasan B’day) आज तिच्या अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. श्रुतीने आजवर अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. आज श्रुती तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्रुती (Shruti Haasan B’day) शंतनु नावाच्या व्यक्तीला डेट करत असल्याने चर्चेत होती. आता तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या लव्ह लाईफ बद्दल.

अभिनेत्री श्रुती कधीकाळी अभिनेता नागा चैतन्यसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अनेक ठिकाणी या दोघांना एकत्रित स्पॉट देखील करण्यात आले होते. 2013 मध्ये हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जात होते. तर त्यांची केमिस्ट्री देखील स्पष्टपणे दिसत होती. अनेक अवॉर्ड शोमध्ये देखील त्या दोघांना एकत्रित पाहण्यात आले होते. तर 2013 मध्ये साउथ इंडियन फिल्म पुरस्कार सोहळ्यात या दोघांमधील जवळीक स्पष्ट दिसून आली होती. यांचे रिलेशन लग्ना पर्यंत जाऊन पोहोचले होते. मात्र नागाच्या एका चुकीमुळे हे रिलेशन तुटल्याचे देखील बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्या रिलेशनचा शेवट श्रुतीची (Shruti Haasan B’day) बहीण अक्षरा हिच्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. श्रुती आणि नागा एका कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. यावेळी श्रुतीचा डान्स परफॉर्मन्स होता. मात्र नागाला दुसऱ्या एका ठिकाणी जावे लागले होते. यावेळी श्रुतीने नागाला अक्षराला ड्रॉप करण्यास सांगितले होते परंतु वेळेच्या अडचणीमुळे नागाला एकटेच जावे लागले आणि त्यानंतर यावरून श्रुती आणि नागांमध्ये फार मोठा वाद निर्माण झाला. आणि या वादामुळेच या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. यानंतर नागाच्या वाढदिवसाला श्रुतीने दोघांचा एक सेल्फी शेअर करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर हे दोघेजण विभक्त झाले.

Web Title :-  Shruti Haasan B’day | happy birthday shruti haasan do you know why actress brokeup with naga chaitnya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed Crime | बीड हादरलं ! अनैतिक संबंधातून प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचे साडीतले फोटो पाहून चाहते घायाळ; देसी लुकला दिला बोल्डनेसचा तडका