Shruti Haasan Breakup | ब्रेकअपनंतर दारूच्या आहरी गेली होती श्रुति हसन, लवकरच वेबसिरीज ‘बेस्टसेलर’ मधून प्रेक्षकांच्या येणार भेटीस.

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. श्रुती हसन लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसिरिज ‘बेस्टसेलर’मध्ये दिसणार आहे. परंतु सध्या श्रुती (Shruti Haasan Breakup) एका अनोख्या कारणामुळं रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत आली आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या एका घटनेमुळं (Shruti Haasan Breakup) नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे.

 

श्रुती हसननं एका मुलाखतीमध्ये आपल्या ब्रेकअपबद्दल सांगितलं होतं. श्रुती म्हणाली, ब्रेकअपनंतरचा काळ माझ्यासाठी अत्यंत भयानक होता. ब्रेकअप नंतर मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. श्रुतीला प्रेमामध्ये धोका मिळाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि त्यामधूनच तिनं दारू पिण्यास सुरुवात केली. ब्रेकअपच्या भयंकर धक्क्यामुळं तिला दारू पिण्याची सवय लागली.

 

श्रुती हसन माइकल कोर्सल (Michael Corsale) या परदेशी कलाकारासोबत रिलेशनशिप मध्ये होती. 2016 मध्ये हे दोघं रिलेशनशिपमध्ये आले. मात्र वैयक्तिक कारणामुळे 2019 ला दोघे विभक्त झाले. यानंतर तिनं सांगितलं की, या ब्रेकअप नंतर ती पूर्णपणे तुटली होती. तिला दारूसारख्या वाईट गोष्टींची सवय लागली आणि यामुळे तिच्या करिअरमध्ये सुद्धा या ब्रेकअपमुळं बरंच नुकसान पोहोचलं. परंतु सध्या तिने स्वत:ला सावरल आहे. (Shruti Haasan Breakup)

https://www.instagram.com/p/CZO5X8MhNrI/?utm_source=ig_web_copy_link

ब्रेकअप नंतर तिला विचारलं असता ती म्हणाली, हे ब्रेकअप माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. या रिलेशनशिपमध्ये तिला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तसेच तिला नेहमीच खऱ्या आणि चांगल्या प्रेमाची वाट बघायला आवडेल.

दरम्यान, याआधी श्रुतीचं नाव रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत जोडलं होतं.
तर तसेच समंथा रुथ प्रभुचे (Samantha Ruth Prabhu) एक्स हजबंड म्हणजेच नागा चैतन्य (Naga Chaitanya) याच्यासोबत देखील तिच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.
तसेच भारतीय क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याच्यासोबत देखील ती नात्यांमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
लवकरच श्रुतीची वेब सिरीज ‘बेस्टसेलर (Bestseller Web Series 2022)’ 18 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
तिच्या आगामी वेबसिरीजसाठी रसिक प्रेक्षक चांगलेच आतुर झालेले पाहायला मिळतात.

 

Web Title :- Shruti Haasan Breakup | shruti haasan was addicted to alcohol after breakup will be seen in saco thriller bestseller web series

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा