मोठा खुलासा ! ‘दारू’ बाबत श्रुती हासननं सांगितलं असं काही की तुम्हाला विश्वासच बसणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री श्रुती हासनने आपल्या व्यसनाबद्दल खुलून भाष्य केलं आहे. ब्रेकअपनंतर ती दारूच्या खूपच आहारी गेल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. फीट अप विथ स्टार्स असं या चॅट शोमध्ये बोलताना तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलून भाष्य केलं. ब्रेकअप झाल्यानंतर तिने पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे.

श्रुती म्हणाली, “मी व्हिस्कीच्या इतकी आहारी गेले होते की, त्याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला. हे व्यसन इतकं वाढलं होतं की, मला अभिनयातून ब्रेक घ्यावा लागला होता.” काही दिवसांपूर्वीच तिची तब्येत बिघडली होती. अतिव्यसनामुळे तिला खूप त्रास झाला.

View this post on Instagram

🖤

A post shared by @ shrutzhaasan on

ब्रेकअपबाबत बोलताना श्रुती म्हणाली, “मला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. माझ्यासाठी तो संपूर्ण एक चांगला अनुभव होता. त्यातून मी खूप काही शिकले.” गेल्याच वर्षी ती पूर्णपणे व्यसनमुक्त झाली आहे असंही तिने सांगितलं आहे.

View this post on Instagram

☀️

A post shared by @ shrutzhaasan on

श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नुकतीच ती साऊथ सुपरस्टार धनुष सोबत थ्री या सिनेमात झळकली होती. श्रुती बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येही सक्रिय आहे.

View this post on Instagram

🔥

A post shared by @ shrutzhaasan on

 

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like