अभिनेत्री श्रुती हासनने लुंगी चोरली ! लुंगी नेसून दिली बोल्ड पोज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    अभिनेता कमल हासन हिची लेक अर्थात अभिनेत्री श्रुती हासन ही कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे सतत चर्चेत राहत असते. बर्‍याच वेळा श्रुती ही तिच्या बोल्ड फोटोंसाठी नेहमी चर्चेत राहते. पण, यावेळी ती अधिक चर्चेत आलीय ते लुंगी चोरल्यामुळे.

रेयान स्टीफन या व्यक्तीची लुंगी चोरल्याचे श्रुती हासनने सांगितले आहे. तिने या पोस्टमध्ये रेयानला टॅगही केलंय.

अभिनेता कमल हासनची लेक लुंगी चोरेल का?, असा विचार तरी कोणी करेल? पण, श्रुती हासनने चक्क एका व्यक्तीची लुंगी चोरली आहे. इतकेच नाही तर ही लुंगी नेसून तिने हॉट पोजही दिल्या आहेत.

श्रुती हासनने अलीकडेच व्हेकेशन एन्जॉय करताना काही बोल्ड फोटो पोस्ट केलेत. एका फोटोत तिने फ्लॉवर बिकिनी घालून बोल्ड पोज दिली आहे. श्रुती हासनने शेअर केलेल्या इतर फोटोंवरही कमेंट्स येत आहेत. पण, फ्लॉवर बिकिनीतील फोटोवरील कॅप्शनवर विशेष कमेंट्स येताहेत. ‘रंगांमध्ये जगतेय.. तुझी लुंगी चोरण्यासाठी सॉरी…, असे श्रुती हासनने या कमेंटमध्ये लिहिलं आहे.

या अगोदरही अनेक फॅशनेबल आउटफिटमध्ये श्रुती हासनचे फोटो व्हायरल झालेत. श्रुतीचे व्हेकेशन फोटोदेखील कमाल आहेत. त्यावर कमेंट्स अधिक येत आहेत. श्रुती तिच्या नॅचरल लुक्ससाठी प्रसिद्ध असून, मेकअप आणि मेकअपशिवाय असे दोन्ही लुक्स तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.

2008 मध्ये ‘लक’ या बॉलिवूड चित्रपटातून श्रुती हासनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण, हा चित्रपट आपटला. 09/10 यानंतर 2011 मध्ये तेलगू इंडस्ट्रीमध्ये तिचा डेब्यू झाला. हाही सिनेमा जोरात आपटला. पण, यानंतर तिने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत.