टॉलिवूड आणि बॉलिवूडनंतर ‘या’ अभिनेत्रीची हॉलिवूडकडे वाटचाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री श्रुती हसन आता हॉलिवूडकडे वाटचाल करताना दिसत आहे. लवकरच ती अमेरिकन शोमध्ये किलरची भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रुती म्हणाली की, इंग्लंडमध्ये म्युझिक सुरु करताना तिच्या मनात इंडियन अ‍ॅक्ट्रेस म्हणून खूप सारे प्रश्न होते. त्यामुळे तिने युएस आणि युके मध्ये एजंट हायर केला होता. शो मेकर्सकडून ऑडिशन स्क्रिप्ट मिळाल्यानंतर तिने शुट करण्यास सुरुवात केली. तिच्या भूमिकेची शुटींग भारतात होणार आहे.

शो ट्रेडस्टोन मध्ये श्रुती नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये काम करणारी वेटर नीरा पटेलची भूमिका साकारणार आहे. जी खरी तर किलर आहे. ट्रेडस्टोन जेसन बॉर्न सीरीज आहे जी CIA ब्लॅक ओप्स प्रोग्रामच्या वर्तमान आणि खऱ्या गोष्टीला फॉलो करत आहे. हे ऑपरेशन एक सिक्रेट प्रोग्राम आहे. जो बिहेवियर मॉडिफिकेशन प्रोटोकॉलचा वापर करत नियुक्ती केलेल्या लोकांना खुनी बनवतं.

श्रुती हासन आपल्या सिंगिंग करिअरला घेऊन खूपच फोकस्ड आहे असे दिसत आहे. तिच्याकडे लंडनमध्ये दोन प्रोजेक्ट आहेत जे लवकरच रिलीज केले जातील. श्रुती हासन एक सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री आहे. श्रुती जितकी सुंदर आहे तितकीच तिची अ‍ॅक्टींगही सुंदर आहे. श्रुती हासन प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांची मुलगी आहे. श्रुतीने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. असे असले तरी श्रुती हासन साऊथ इंडस्ट्रीत जास्त सक्रिय आहे असे दिसत आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, श्रुतीचं फिल्मी करिअर थोडं स्लो सुरु आहे. सध्या तिच्याकडे फक्त एकच सिनेमा आहे त्याचं नाव आहे लाबाम. या सिनेमात ती विजय सेतुपती सोबत काम करताना दिसणार आहे. श्रुतीने हे राम, लक, दिल तो बच्चा है जी, रमैया वस्तावैया, डी डे, गब्बर इज बॅक, अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. वेलकम बॅक हा तिचा शेवटचा सिनेमा आहे. त्यानंतर श्रुती एकाही हिंदी सिनेमात दिसली नाही.

 

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’