‘मी नेहमीच खऱ्या प्रेमाच्या शोधात राहिले’ : श्रुती हासन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री श्रुती हासनने एका चॅट शोमध्ये बोलताना आपल्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. श्रुतीला याबाबत प्रश्न विचारल्यानंतर तिने यावर भाष्य केलं आहे. मी नेहमीच खऱ्या प्रेमाच्या शोधात राहिले आहे असं तिनं म्हटलं आहे.

श्रुतीला विचारण्यात आलं की, करिअरच्या सुरुवातीला प्रेम आणि रिलेशनशिबाबत तुझे काय विचार होते ? यावर बोलताना श्रुती म्हणाली, “करिअरच्या सुरुवातीला मी कूल होते. मी खूप निरागस होते. प्रत्येकजण माझ्यावर हुकूम चालवायचे. पण मी म्हणेन, हा अनुभव माझ्यासाठी चांगला होता. मी खूप काही शिकले. मी नेहमीच खऱ्या प्रेमाच्या शोधात राहिले आहे.”

View this post on Instagram

#saveaareyforest

A post shared by @ shrutzhaasan on

साऊथ सिनेमांसोबतच श्रुती बॉलिवूडमध्येही जादू कायम आहे. तिने खूप कमी सिनेमात आपली छाप उमटवली आहे. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही तिचा सहभाग असतो.

View this post on Instagram

🖤

A post shared by @ shrutzhaasan on

श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर श्रुतीने हे राम, लक, दिल तो बच्चा है जी, रमैया वस्तावैया, डी डे, गब्बर इज बॅक, अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. वेलकम बॅक हा तिचा शेवटचा सिनेमा आहे. त्यानंतर श्रुती एकाही हिंदी सिनेमात दिसली नाही.

View this post on Instagram

🔥

A post shared by @ shrutzhaasan on

 

Visit : Policenama.com

 

You might also like