‘शुभ लग्न सावधान’ १२ ऑक्टोबरला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.  सध्या सुबोध भावेची भूमिका असणारे वेगवेगळ्या विषयांवरचे  मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्याची मुख्य भूमिका असणारा ‘शुभ लग्न सावधान ‘ हा चित्रपट १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचेही नवीन पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे.

फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाद्वारे सुभोधा भावे आणि श्रुती मराठे हि जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0cd44c17-aaa7-11e8-b81b-73cdd3ff443c’]

‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमामध्ये  श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये यांच्या भूमिका  आहेत. एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका तरुणाची  झालेली मजेशीर अवस्था यावर आधारित हा चित्रपट आहे.