Shubh Mangal Zyada Saavdhan Review : ‘गे’ कपलमुळं कुटुंबात गोंधळ, ‘असा’ आहे आयुष्मानचा सिनेमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा शुभमंगल ज्यादा सावधान हा सिनेमा आजच (शुक्रवार दि 21 फेब्रुवारी रोजी) रिलीज झाला आहे. हा सिनेमा त्याच्यासाठी मैलाचा दगड ठरू शकते. कारण या सिनेमाचा अंदाज इतर समलिंगींवर आधारीत सिनेमांच्या तुलनेत काहीसा वेगळा आहे. कारण या पूर्वी आलेल्या काही सिनेमात हे विषय गंभीरतेनं हाताळले आहेत. परंतु आयुष्मानच्या सिनेमात हा विषय कॉमेडी जॉनरनं हाताळला आहे.

सिनेमाची स्टोरी
शंकर त्रिपाठी (गजराव राव) एक वैज्ञानिक आहेत जे काळ कोबी बनवण्याचा अविष्कार करतात. त्यांचा मुलगा अमन दिल्लीत काम करतो जो कार्तिक(आयुष्मान) सोबत नात्यात आहे. शंकरचा लहान भाऊ चमनची मुलगी गॉगलच्या लग्नात सगळे जमतात. नाचगाणं सुरु असताना ट्रेनमध्ये अमन आणि कार्तिक किस करतात. यांतर सर्वांना धक्का बसतो. शंकरला हा आजार वाटतो ते अमनला समजावतात. परंतु शेवटी अमनच त्यांना त्याची समजावून सांगतो. अशी सगळी सिनेमाची स्टोरी आहे.

डायरेक्शन

टॅबू सबजेक्ट, शहरी वातावरण आणि कॉमेडीच्या मदतीनं गंभीर मुद्दा प्रेक्षकांसमोर मांडला आहे. स्किप्टच्या पातळीवर डायरेक्टर हितेश केवल्याकडून थोडी चूक झाल्याचं दिसत आहे. समलिंगीचे स्टीरियोटाईप्स तोडण्यात सिनेमा यशस्वी झाला आहे. परंतु तुम्हाला कळतं की, पुढे काय होणार आहे. सिनेमा काहीसा कंटाळवाणा वाटतो. फर्स्ट हाफमध्ये आयुष्मानचा अतिउत्साहीपणा समजण्यापलीकडे आहे. काही सिक्वेंस पाहून असंही वाटतं की, सिनेमा वास्तवतेपासून दूर गेला आहे. परंतु सिनेमाची इम्प्रेसिव स्टार कास्ट आणि जबरदस्त कॉमिक डायलॉग्स खूपच मनोरंजक आहेत. एडिटींगमध्ये आणखी धारदारपणा आला असता तर सिनेमा आणखी शानदार झाला असता.

अ‍ॅक्टींग
आयुष्मान एक एफर्टलेस कलाकार आहे. या सिनेमातही त्यानं तसंच काम केलं आहे. सिनेमाच्या फर्स्ट हाफमध्ये त्याची ओवरएक्साईटमेंट समजण्यापलीकडे आहे. जितेंद्र कुमार एक परेशान तरूण म्हणून सूट करतो. या सिनेमात लिड स्टारकास्टपेक्षा इतर कलाकारांवर लक्ष खिळून राहताना दिसतं. या सिनेमात सर्वांनाच स्पेस मिळाली आहे. गजराव राव आणि नीना गुप्ता बधाई होनंतर पुन्हा एकदा पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा मनोरंजन केलं आहे. मनुऋषी चड्ढानं काका म्हणून आणि सुनीता राजवरनं काकू म्हणून चांगली कॉमेडी केली आहे. अनेक ठिकाणी सुनीतानं भाव खाल्ला आहे.

का पहावा सिनेमा ?
जर तुम्ही आयुष्मानचे चाहते आणि होमोफोबिक असाल तर तुमच्या शंका तुम्ही कॉमेडी अंदाजात दूर करू शकता. हा एक कॉमेडी एंटरटेनिंग फॅमिली एंटरटेनर सिनेमा आहे.

You might also like