शुभमंगल ज्यादा सावधान ! आयुष्मान खुरानाला लिपलॉक ‘KISS’ केल्यानंतर जितेंद्रनं केलं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना सध्या आगामी सिनेमा शुभमंगल ज्यादा सावधान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या आयुष्मान आणि त्याची टीम प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे. मुलाखतीदरम्यान कलाकारांकडून अनेक गोष्टींवर भाष्य केलं जाताना दिसत आहे. या सिनेमात आयुष्मानचा आपल्या मेल कोस्टारसोबत लिपलॉक किसिंग सीनही आहे. ट्रेलरमध्ये याची झलक पहायला मिळते.

नेहमीच सिनेमात काही तरी वेगळं करणाऱ्या आयुष्माननं या सिनेमात समलिंगीची भूमिका साकारली आहे. जो आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडतो. अभिनेता जितेंद्र कुमारनं ही दुसऱ्या समलिंगीची भूमिका साकारली आहे. या सिनेमात जितेंद्र आणि आयुष्मान यांचा लिपलॉक किसींग सीन आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील या सीनचा मेकिंग व्हिडीओ समोर आला होता. यानंतर आता जितेंद्र कुमारनं याचा खुलासा केला आहे की, आयुष्मानसोबत लिपलॉक केल्यानंतर त्यानं नेमकं काय केलं.

सिनेमाची टीम प्रमोशनसाठी सलमान खानचा शो बिग बॉस 13 मध्ये आली होती. यावेळी सलमान खाननं जितेंद्रला विचारलं की, किस केल्यानंतर तू काय केलंस ? यावर जितेंद्रनं जे उत्तर दिलं ऐकून सलमानसहित सारेच हसू लागले. जितेंद्रनं सांगितलं, “आयुष्मानला किस केल्यानंतर मी लगेच गरप पाणी पिलं आणि गुळणाही केला.”

आयुष्मान आणि जितेंद्र यांचा हा सिनेम 21 फेब्रुवारी रोजी रोलीज होणार आहे. या सिनेमात बधाई हो सिनेमातील नीना गुप्ता आणि गजराज रावा यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like