2020 मधील सर्वाधिक ‘लोकप्रिय’ रिमेक साँग – ‘यार बिना चैन कहां रे’, आयुष्मानसोबत थिरकले ‘गोल्डनमॅन’ बप्पी दा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना गेल्या अनेक दिवसांपासून शुभमंगल ज्यादा सावधान सिनेमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या सिनेमात आयुष्मान काही वेगळ्याच रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमातील एक धमाकेदार रिमिक्स साँगही रिलीज करण्यात आलं आहे. यार बिना चैन कहां रे असं या गाण्याचं नाव असून आजच हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

युट्युबवर या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दीर्घकाळातनंतर आयुष्मानसोबत गोल्डन मॅन नावानं फेमस असणारे सिंगर बप्पी लहरी देखील दिसत आहेत. 1999 साली आलेल्या बप्पी दा यांच्याच साहेब या सिनेमातील हे गाणं आहे. हे गाणं अभिनेता अनिल कपूर आणि अमृता सिंह यांच्यावर शूट करण्यात आलं होतं.

सिनेमाबद्दल बोलयचं झालं तर शुभमंगल ज्यादा सावधान हा सिनेमा समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा आहे. 21 फेब्रुवारी 2020 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांचा लिपलॉक किसिंग सीन आहे. ट्रेलरमध्येही याची झलक पहायला मिळते. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सीनचीही खूप चर्चा होताना दिसली.