Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer : गे कपल असलेल्या आयुष्मान-जितेंद्रचा ‘लिपलॉक’ KISS आणि ‘ड्रामा’

मंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाचा शुभमंगल ज्यादा सानधान या सिनेमाचा ट्रेलर अखेर लाँच झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना सिनेमच्या ट्रेलरची प्रतिक्षा होती. या सिनेमात आयुष्माननं गे ची भूमिका साकारली आहे. सिनेमात आयुष्मान आणि जितेंद्र कुमार यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. एकामागोमाग एक 7 हिट सिनेमे दिल्यानंतर आता आयुष्मानचा आणखी एक सिनेमा येत आहे.

आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा आहे. शुभमंगल ज्यादा सावधान या सिनेमाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. यानंतर आता ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा 21 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. ट्रेलरमध्ये आयुष्मान आणि जितेंद्र यांचा लिपलॉक किसिंग सीनही पाहायला मिळत आहे.

आयुष्मान खूपच वेगळ्या भूमिकेत या सिनेमात पहायला मिळणार आहे. या सिनेमात आयुष्मान गे दाखवला आहे. एक गे लव्ह स्टोरी या सिनेमात दिसणार आहे. आयुष्मान पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री नीना गुप्ता आणि गजराज राव पुन्हा एकदा या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. याशिवाय या सिनेमात सुनिता राजवार, मानवी गाारू, पंखुडी अवस्थी, नीरज सिंग, मनु ऋषी चड्ढा हेही कलाकार या सिनेमात दिसणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –