चायनीज अ‍ॅप असल्यानं ‘अंगुरी भाभी’ शुभांगीन डिलीट केलं TikTok, चाहत्यांना केलं ‘हे’ अपील !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भाभीजी घर पर है या मालिकेतून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या चर्चेत आहे. शुभांगी म्हणजेच अंगुरी भाभी गेल्या काही दिवसांपासून आपल्या लुकमुळे चर्चेत येत आहे. शुभांगीचे अनेक फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत. फोटोनंतर शुभांगी आता टिकटॉकमुळं चर्चेत आली आहे. सध्या सुरू असलेल्या #BanTikTok या अभियानाला तिनं सपोर्ट केला आहे. तिनं तिचं टिकटॉक अकाऊंट आणि अॅप दोन्हीही डिलीट केलं आहे. सोबतच तिनं चाहत्यांनाही असं करण्यासाठी अपील केलं आहे.

https://www.instagram.com/p/B_9E9IrB2Qs/?utm_source=ig_embed

टॉकटॉक डिलीट करत लोकल व्यवसायाला सपोर्ट करत असल्याची माहिती देत शुभांगी म्हणाली, “मी टिकटॉक यासाठी सोडलं आहे, कारण मला देशातील लोकल व्यवसायांना सपोर्ट करायचा आहे. मला नाही वाटत की, या अॅप्सनं आपल्या देशावर वाईट प्रभाव टाकावा. हे एक फेमस अॅप आहे. प्रमोशनला याचा वापर केला जाऊ शकतो हे खरं असलं तरी मी हे अॅप आता वापरणार नाही. कारण मला माझ्या देशाला सपोर्ट करायचा आहे.”

https://www.instagram.com/p/CAAnDx0BMLF/?utm_source=ig_embed

शुभांगी पुढे म्हणते, मला आशा आहे की, बाकी लोकही या अभियानाला सपोर्ट करतील आणि चायनीज अॅप डिलीट करून लोकल अॅप्सचा वापर करतील.

https://www.instagram.com/p/CAxd7HPhnO_/

शुभांगीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शुभांगीनं भाभीजी घरपर है या मालिकेत शिल्पा शिंदेला रिप्लेस केलं आहे. शुभांगीच्या अभिनयाला चाहत्यांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. तिला मालिकेत येऊन 3 वर्ष झाली आहेत. ती खूप लवकर या रोलमध्ये फिट झाली. शुभांगीनं याआधी दो हंसो का जोडा, कस्तुरी, चिडीया घर, कसौटी जिंदगी की, यांसारख्या फेमस मालिकेत काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/CAuw45vhSpD/

https://www.instagram.com/p/CAwnVyABNVG/

https://www.instagram.com/p/CAnAZBdBUVN/

https://www.instagram.com/p/CAXww9RBxzw/