मुंबई : Shubhangi Gokhale | अभिनेत्री शुभांगी गोखले घराघरांत लोकप्रिय आहेत. सध्या त्या ‘घरत गणपती’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल परखड मत मांडले आहे. त्यामुळे आता नवा वाद उभा राहू शकतो.
“मी मूळची मराठवाड्याची असल्याने गणेशोत्वाबाबत माझ्या जास्त काही आठवणी नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी गणपती असतो. आणि मुंबईत अलीकडे बाहेरून आलेली माणसं सुद्धा गणपती बसवतात. नेपाळ, युपी वरून आलेले लोक सुद्धा गणेशोत्सव साजरा करतात पण खरा गणपती हा कोकणातलाच आहे”, असे अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सांगितले. (Sarvajanik Ganeshostav)
त्या पुढे म्हणाल्या, ” मी गणेशोत्सवात पुण्यातल्या पाच गणपतींचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर मी मुंबईतला गणेशोत्सव सुद्धा पाहिला आहे. पण, सार्वजनिक गणपतीबद्दल सांगायचं झालं तर, गणेशोत्सवाचं जे काही अवडंबर झालं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. याशिवाय अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. सार्वजनिक गणपती आपण मोठ्या भक्तिभावाने करतो पण, मला असं वाटतं आता आपण सार्वजनिक गणपती नाही केले पाहिजेत. रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही गणेशोत्सव साजरा करता पण, त्यानंतर रात्री तुम्ही दारू पिऊन पत्ते खेळणं वगैरे चालतं आणि हे कोणीच अमान्य करू शकत नाही. हे एकदम चुकीचं आहे हे अजिबातच चांगलं नाही.
या सगळ्या गोष्टी करून तुम्ही तुमच्याच देवाचा अपमान करता. त्यामुळे आता हे बंद केलं पाहिजे. छोट्या- छोट्या गावांमध्ये आता एक गाव एक गणपती अशी प्रथा सुरू केली आहे. त्यामुळे आपण आता असे बदल केले पाहिजेत. कारण, सार्वजनिक गणेशोत्सवात प्रदूषण होते, एनर्जी वाया जाते. मला वाटतं घरोघरी जो गणपती बसतो तो खूपच सुंदर असतो “, असं परखड मत शुभांगी गोखले यांनी मांडलं आहे.
दरम्यान अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र यांच्याकडून गोखले यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात
आला आहे. त्यामुळे यावर आता गोखले काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भूषण प्रधान, निकिता दत्ता, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुभांगी गोखले,
संजय मोने ही सगळी मंडळी असलेला घरत गणपती हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
नात्यांची एक सुरेख गोष्ट या सिनेमातून सांगण्यात आली आहे.
त्यामुळे प्रेक्षकांच्या देखील पसंतीस हा सिनेमा उतरत असल्याची सध्या चर्चा आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा