Shubhangi Patil | महाविकास आघाडीच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पाठिशी ‘नगर मधील अज्ञात शक्ती’; काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने चर्चांना उधान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेचा नाशिक पदवीधर मतदार संघ (Nashik Graduate Constituency) चांगलाच चर्चेत राहिला. त्यातच आता नाशिकमध्ये शुभांगी पाटील (Shubhangi Patil) विरूध्द सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. आज महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील या प्रचारार्थ अहमदनगर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ‘शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या पाठीशी नगर जिल्ह्यातील एक अज्ञात शक्ती आहे, त्यामुळे पाटील यांचा विजय निश्चित आहे.’ त्यानंर आता ही अज्ञात व्यक्ती कोण? याची चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शुभांगी पाटील आज प्रचारार्थ अहमदनगर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी आयोजीत बैठकीत विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) म्हणाले की, ‘जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व्यक्ती पूजेपेक्षा विचारधारेला व पक्षाच्या आदेशाला महत्व देतात. याशिवाय नगर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत अज्ञात शक्ती कार्यरत असते. या शक्ती निवडणुक निकालाला दिशा देतात. त्यामुळे नगर जिल्ह्यातून निश्चितच शुभांगी पाटील यांना आघाडी मिळेल.’

अहमदनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांची सर्वपक्षीय यंत्रणा चर्चेत असते. विखे कोणत्याही पक्षात असले तरी ही यंत्रणा विखे-पाटील यांना हवी असलेली कामगिरी करते, अशी चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी होत असते. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या भूमिकेकडे जसे लक्ष लागले आहे. तसेच विखे-पाटील यांच्या देखील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, पक्षाने पाठिंबा दिला तर तांबे यांच्यासाठी काम करण्याची भूमिका त्यांनी अगोदरच व्यक्त केली आहे. मात्र काँग्रेस पक्षाकडून निलंबित करण्यात आल्यानंतर देखील अद्याप भाजपने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिलेला नाही. त्यातच काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नगर जिल्ह्यातील अज्ञात शक्ती असा उल्लेख करण्यात आल्याने. ती शक्ती नेमकी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, नगर येथे आयोजीत या बैठकीत बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील म्हणाल्या की,
‘मी सर्वसामान्यांची प्रतिनीधी म्हणून उभी आहे. मागील अनेक वर्ष मी शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करीत आहे.
आझाद मैदानावर दीडशे पेक्षा जास्त आंदोलनांचे मी नेतृत्व केले आहे.
धनशक्तीच्या कोणत्याही अमिषाला बळी न पडता या निवडणुकीत इतिहास घडवा.
‘ असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

Web Title :- Shubhangi Patil | shubhangi patil won nashik mlc election said by congress leader vinayak deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळेलही, पण त्यांच्यामुळे बाळासाहेब थोरात अडचणीत आले – छगन भुजबळ…

Bhaskar Jadhav | ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे निवडणूक आयोगावर ताशेरे; म्हणाले…