‘या’ महिलेमुळं बिघडला काँग्रेसचा मध्यप्रदेशातील ‘खेळ’ अन् भाजपचे झाले ज्योतिरादित्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीकडेच घडलेली मोठी राजकीय घडामोड म्हणजे कॉंग्रेसचे माजी खासदार आणि ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्यातील ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधिया याना भाजपामध्ये आणण्यासाठी ज्या महिलेची जास्त चर्चा होत आहे त्या बडोदा राजघराण्यातील राजमाता शुभांगी देवी आहेत.

खरं तर, सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडल्यामुळे मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले आहे. सरकार सध्या संकटांत आहे. दुसरीकडे, सिंधिया यांनाही मध्य प्रदेशमधील राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाची पटकथा त्यांच्या सासरकडून लिहिली गेली आहे असे म्हंटले जाते. सिंधियाचे सासर बडोदा राजघराण्यात आहेत. असे म्हटले जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात मध्यस्थी करण्यात बडोदा राजघराण्याच्या राणी राजमाता शुभांगी देवी गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजमाता शुभांगी देवी गायकवाड यांचा खूप आदर करतात. राजमाता शुभांगी देवी गायकवाड यांनी सिंधिया आणि भाजप नेतृत्व यांच्यात चर्चेचा मार्ग मोकळा केला. ज्योतिरादित्य यांची पत्नी प्रियदर्शिनी राजे सिंधिया बडोद्याच्या गायकवाड राजघराण्यातील आहेत. शुभांगीनी देवी यांच्यामुळेच सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रियदर्शिनीच्या आई आहेत शुभांगीनी
बडोद्याच्या राजमाता शुभांगी राजे प्रियदर्शिनीची आई आहेत. शुभांगी यांचा संबंधही ग्वाल्हेरशी आहे. त्या ग्वाल्हेरच्या शाही जाधव कुटुंबातील आहे. 75 वर्षीय शुभांगी राजे यांनी बडोदाच्या खेडा संसदीय मतदारसंघातून दोनदा लोकसभा निवडणूक लढविली. ते 1996 मध्ये अपक्ष म्हणून तर 2004मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविली. दोन वेळा त्यांनी निवडणूक हरली. शुभांगीनी यांचे पती रणजितसिंग गायकवाड हे कॉंग्रेसचे नेते होते आणि ते 1980 ते 89 या काळात बडोद्याचे कॉंग्रेसचे खासदार होते.

दुसरीकडे भाजपनेही सिंधिया प्रकरणाची जबाबदारी नरेंद्र सिंह तोमर यांना दिली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वासू तोमर यांना काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात भाजपच्या रणनीतीची जबाबदारी देण्यात आली होती. तोमर यांनी मध्य प्रदेशातील भाजपा अध्यक्षपदापासून राज्यातील कॅबिनेट स्तरावरील मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. सिंधिया समर्थक 22 आमदारांनीही राजीनामा दिला आहे, त्यानंतर कमलनाथ सरकारच्या सत्तेतून निघण्याचा मार्गावर आहे. मात्र, कमलनाथ, दिग्विजय सिंह यांच्यासह कॉंग्रेसच्या नेत्यांनी सरकारला वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे.