Google चा जावई शोध, सारा सचिन तेंडुलकर शुभमन गिलची बायको

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या अनुषंगाने आयपीएलचा तेरावा हंगाम दुबईत खेळवण्यात येत असला तरी मैदानासोबत मैदाबाहेर सुद्धा गाजत आहे. तद्वतच चाहत्यांचा उत्साह थोडाही कमी झाला नसून समाज माध्यमात संघ, खेळाडू, त्यांची कामगिरी, मैदानाबाहेरील किस्से यांचे मिम्स व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी गुगलवर हैदराबादचा फिरकीपटू राशिद खानची बायको सर्च केल्यावर अनुष्का शर्माचं नाव येत असल्याची चर्चा होती. तथापि, आता त्याच कारणाने युवा क्रिकेटपटू शुभमन गिल चर्चेत आला आहे.

गुगलवर शुभमन गिलची बायको सर्च करण्यात आल्यावर सारा तेंडुलकर असे उत्तर मिळत आहे. सारा ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या असून, शुभमन सध्या कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करतोय. शुभमन गिल हा २१ वर्षांचा आहे. अजून त्याचे लग्न झालेलं नाही. मात्र, गुगलवर ‘शुभमन गिल वाईफ’ सर्च केल्यावर साराच नाव का समोर येत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच उत्तर काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रसांगात दडलं आहे.

शुभमन इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी नवी कार खरेदी केल्यानंतर एक फोटो शेअर केला होता. त्यावर साराने अभिनंदनाची कमेंट केली होती. व कमेंटपुढे काळ्या रंगाचं हार्ट टाकलं होते. शुभमन देखील हार्ट इमोजीचा वापर करत साराचे आभार मानले. ही गोष्ट क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या लक्षात आली. त्याने शुभमनची थट्टा करण्यासाठी लगेच खाली कमेंट करत ‘तिच्याकडूनही तुझे खूप खूप आभार’ असे म्हटले होते. तेव्हापासूनच सारा आणि शुभमनचे नाव एकत्र चर्चेत आले.

साराने २९ जुलै रोजी आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्याच दिवशी शुभमन गिलने स्वतःचा एक फोटो ट्विट केला. दोन्ही फोटोचं शिर्षक एकच (आय स्पाय) होत. त्याची देखील बरीच चर्चा समाज माध्यमात झाली. तर दोनच दिवसांपूर्वी (१२ ऑक्टोबर) साराचा वाढदिवस होता. त्या दिवशी केकेआरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होता. या सामन्यात शुभमनने चांगली सुरुवात केली. पण तो ३४ धावांवर बाद झाला. त्याचीही समाज माध्यमात बरीच चर्चा रंगली होती.