गिनीज बुकमध्ये नोंद आहे श्वेता बच्चनच्या सासु ऋतु नंदा यांचं नाव, केला होता ‘हा’ विक्रम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इन्शुरन्स एडवाइजर असलेल्या ऋतु नंदा यांनी या जगाला निरोप दिला आहे. त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार केले जातील. ऋतु नंदा एक उद्योजक होत्या. ऋतु जीवन विमा महामंडळाशी संबंधित होत्या. त्यांचे लाइफ इन्शुरन्सच्या क्षेत्रात खूप मोठे नाव होते. त्यांच्या नावावर एका दिवसात 17 हजार पेन्शन पॉलिसी विक्री केल्याचा गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड आहे.

१९८० मध्ये जेव्हा ऋतु इन्शुरन्स एजंट झाल्या तर ही दुसरी वेळ होती त्यांनी कोणत्या व्यवसायात प्रवेश केला. पूर्वी, NikiTasha नावाची त्यांची स्वयंपाकघर उपकरणे कंपनी फारशी यशस्वी झाली नव्हती. तसेच ऋतु नंदा Insurance Services च्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

कोण आहे ऋतु नंदा ?
ऋतु नंदा कर्करोगाशी झगडत होत्या. २०१३ साली ऋतु यांना कर्करोग झाल्याचे आढळले होते आणि तेव्हापासून त्या या आजाराशी लढत होत्या. त्याचा भाऊ रणधीर कपूर यांनी याबाबत माहिती दिली होती. ऋतु नंदाचा जन्म ३० ऑक्टोबर १९४८ रोजी झाला होता. ऋतूचे राजन नंदासोबत लग्न झाले होते. २०१८ मध्ये श्वेता बच्चन यांचे सासरे ऋतु नंदा यांचे पती राजन नंदा यांचे निधन झाले. ऋतु यांना दोन मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचे नाव निखिल नंदा आणि मुलीचे नाव नताशा नंदा आहे.

ऋतु यांचा जन्म कपूर कुटुंबात झाला होता. त्या राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांची कन्या आणि रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर आणि रीमा जैन यांची बहीण होत्या. त्यांचा बच्चन कुटुंबाशीही संबंध आहे. अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन ही त्यांची सून आहे.

फेसबुक पेज लाईक करा –