श्वेता बच्चननं वाढदिवसानिमित्त शेअर केला जया बच्चनचा जुना फोटो ! अभिषेक बच्चननं केलं ‘ट्रोल’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूडमधील दिग्गज अ‍ॅक्ट्रेस जया बच्चन आज(दि 9 एप्रिल 2020) आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या कोरोनामुळं सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये त्या दिल्लीतच अकडल्या आहेत. त्यांचं कुटुंब मात्र त्यांना खूप मिस करत आहे. त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिनं आईची आठवण काढत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं एक फोटो शेअर केला आहे ज्या जया बच्चन यंग दिसत आहे आणि श्वेता व अभिषेक लहान मुलं.

फोटो शेअर करताना श्वेतानं लिहिलं की, “मी तुमचं हृदय माझ्यासोबत घेऊन चालत असते. तुम्ही माझ्या हृदयातच राहता. मी कधीच याशिवाय नसते. मी जिथे जाते तिथे तुम्ही माझ्या सोबत असता. हॅप्पी बर्थ डे आई. आय लव्ह यू.” कॅप्शन तसं तर कमालीचं आहे. परंतु सोशल मीडिया युजर्सचं लक्ष मात्र इतर गोष्टींवर गेलं आहे. फोटोत जया पुस्तक वाचताना दिसत आहेत. अभिषेक सॉफ्ट ड्रिंक घेत आहे तर श्वेताही कुठे तर हरवली आहे.

या फोटोवर श्वेताची मुलगी नव्यानं कमेंट केली की, तू इथं विचारात मग्न आहेस. अभिषेक बच्चननंही तिला साथ दिली आहे. त्यानं लिहिलं की, “कमीत कमी ती इथं फोन तरी वापरत नाहीये.” जेव्हा श्वेतानं पाहिलं की, दोघंही तिची मजा घेत आहेत तर तिनं यावर कमेंट करत लिहिलं, व्हेरी फनी. इतरही काही युजर्सनं श्वेताच्या या अ‍ॅबसेंट माईंडेडनेसवरून तिची मजा घेतली आहे. सध्या अभिषेक आणि श्वेता दोघंही जयाला खूप मिस करत आहेत.

You might also like