‘मकडी फेम’ श्वेता लग्नानंतर ‘गुपचूप’ घेत आहे ‘घटस्फोट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद हिने 1 वर्षांपूर्वा सिक्रेट विवाह केला होता. परंतू विवाहाच्या एका वर्षानंतर आता तीने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने काही दिवसांपूर्वी या बाबत सांगितले होते. आता तिने सांगितलंय की तिने आणि तिच्या पत्नी (रोहित मित्तल) घटस्फोटासाठी फाइल दाखल केली आहे.

मकडी सिनेमातील अभिनेत्री श्वेता बसू प्रसादने काही काळापूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन रोहित मित्तलपासून वेगळं होत असल्याचे जाहीर सांगितले होते. यावेळी ती म्हणाली की ते दोघांच्या सहमतीने वेगळे होत आहेत.

यावर पुन्हा एकदा बोलताना श्वेता म्हणाली की, आम्ही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. 1 वर्षांनंतर घटस्फोट का घेत आहे याचे कारण सांगताना ती म्हणाली की रोहित आणि मी आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. आम्ही एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

श्वेता म्हणाली की, माझ्या अ‍ॅंक्टिग करिअरमध्ये रोहितने मला चांगली साथ दिली. त्यामुळे मी त्यांची चाहती आहे. तो एक चांगला फिल्ममेकर आहे. मला अपेक्षा आहे की आम्ही पुढे देखील एकत्र काम करु. आम्ही 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. आता आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आमची मैत्री कायम राहिलं.

13 डिसेंबर 2018 ला सिनेनिर्माता रोहित मित्तलशी श्वेताने गुपचूप लग्न केले होते, त्यांचा विवाह बंगाली परंपरेनुसार पुण्याच्या ग्रॅंड हयातमध्ये झाले होते. त्यानंतर त्याचे बंगाली पोशाख परिधन केलेले फोटो व्हायरल झाले होते. त्यांची सिक्रेट लग्नाची बातमी चाहत्यामध्ये पसरली होती. त्यांच्या लग्नाने लोक देखील थक्क झाले. त्यामुळे आता ते दोघे वेगळे होत असल्याने चाहते हैराण झाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like