‘प्रायव्हेट’ फोटो शेअर केल्यानं ट्रोल झाली होती अभिनेत्री श्वेता साळवे, आता दिलं खणखणीत प्रत्युत्तर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री श्वेता साळवे आपल्या बोल्ड फोटोंसाठी सोशल मीडियावर फेमस असते. अनेकदा ती आपल्या फोटोमुळं आणि हॉटनेसनं अटेंशन घेत असते. कधी कधी ती आपल्या फोटोंमुळं सोशलवर राडा घालते तर कधी ट्रोलही होत असते. अशाच काही ट्रोलर्सला तिनं उत्तर दिलं आहे.

श्वेतानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. यात ती प्रचंड बोल्ड अवतारात दिसत होती. यातील एक फोटोत ती पतीला किस करताना दिसली होती ज्यावरून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. ट्रोलर्सचं म्हणणं होतं की, प्रायव्हेट मुमेंट अशा सोशलवर का शेअर कराव्यात. श्वेतानं आता ट्रोलर्सला जोरदार उत्तर दिलं आहे. तिचं म्हणणं आहे की, लोक तिला अनफॉल करू शकतात हा ऑप्शन त्यांच्याकडे आहे.

एका मुलाखतीत बोलताना श्वेता म्हणाली, “माझा प्रत्येक फोटो कॅप्शनमध्ये कलात्मक मतासोबत येत असतो. म्हणून मी नेहमी माझ्या फॉलोवर्सला वेळ काढून ते वाचण्याचा आग्रह करत असते, असं नाही की त्यांनी फक्त स्वाईप करावं, ब्राऊज करावं आणि एक झलक पाहून जज करावं. आपण जे पाहतो त्याहून खूप काही जास्त असतं.”

श्वेता म्हणते, “जे धैर्यानं ऐकतात त्यांच्यासाठी कायमच सकारात्मक मेसेज असतो, जे मला थेट मेसेज करतात त्यांना मी उत्तरही देत असते. आजच्या जगात आपण इतरांना जज करण्यापेक्षा त्यांचं स्वागत करायला हवं.”

श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हिप हिप हुर्रे, लेफ्ट राईट लेफ्ट अशा अनेक टीव्ही शोमध्ये तिनं काम केलं आहे. सध्या श्वेता पती हरमीत आणि मुलीसोबत गोव्यात राहते.