अभिनेत्री श्वेता तिवारी पतीला म्हणाली, ‘विषारी इंफेक्शन’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस श्वेता तिवारीच्या खासगी आयुष्यात खूपच चढ उतार सुरू आहेत. अभिनव कोहली सोबत तिनं केलेलं लग्न वादात आहे. हे प्रकरण एवढं वाढलं की, तिने अभिनव विरोधात पोलिसांत घरगुती हिंसेची तक्रार दाखल केली होती. पहिल्यांदाच तिने यावरील मौन सोडलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना श्वेता तिवारीने पती अभिनव कोहलीची तुलना विषारी इंफेक्शन सोबत केली आहे. श्वेता म्हणाली की, “खरं सांगायचं झालं तर मी आता खुश आहे. एका इंफेक्शनमुळे मी माझ्या वाईट काळातून जात होते. परंतु आता त्यावर उपचार झाला आहे. आता ते इंफेक्शन शरीराच्या बाहेर निघालं आहे. एक असं इंफेक्शन ज्याला मी खूप वैतागले होते जे मी आता काढून फेकलं आहे.”

View this post on Instagram

🍂

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

पुढे श्वेता म्हणाली, “लोकांना वाटलं की तो माझ्या शरीराचा हिस्सा होता. परंतु लोकांना समजायला हवं की, तो विषारी होता. त्यामुळे मला त्यातून बाहेर पडावं लागलं. आता मी पुन्हा निरोगी आहे. असं नका समजू की, मी स्वत:ला खुश दाखवत आहे. मी खरंच खुश आहे.

श्वेता म्हणाली की, ती त्या लोकांपेक्षा चांगली आहे ज्यांचा घरी पती आहे आणि बाहेर बॉयफ्रेंड आहे किंवा घरी पत्नी आहे आणि बाहेर गर्लफ्रेंड आहे. “मी त्यांच्यापेक्षा चांगली आहे की, मी समोर येऊन सांगितले की, बस आता मला लग्नात राहायचं नाही. मला लोक काय म्हणतात याने काही फरक पडत नाही. मी त्यां महिलांसाठी एक स्टँड घेणार आहे ज्या घाबरतात की, लोक काय म्हणतील. जर पुन्हा लग्नात प्रॉब्लेम येत असेल तर पुढे येऊन बोलणं गरजेचं आहे.”

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like