Shweta Tiwari Controversial Statement | श्वेता तिवारीनं केलं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाली – ‘माझ्या ब्रा ची साईज..’ (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari Controversial Statement) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. श्वेता तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळं देखील प्रेक्षकांना भुरळ पाडत असते. ती सोशल मीडियावर सतत हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. अलीकडेच ती तिच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळं (Shweta Tiwari Controversial Statement) तुफान चर्चेत आली आहे.

 

 

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) लवकरच आता एका वेबसिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी श्वेता भोपाळला गेली होती. भोपाळमध्ये श्वेतासह तिची संपूर्ण टीम पत्रकार परिषदेत उपस्थित होती. मात्र या पत्रकार परिषदेतील (Press Council) एका वक्तव्यामुळे श्वेता चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ती म्हणाली, ‘माझ्या ब्रा ची साईज देवच घेत आहे.’ तिचं हे विचित्र वक्तव्य (Shweta Tiwari Controversial Statement) ऐकून सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

 

 

श्वेताच्या या वक्तव्यानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Home Minister Narottam Mishra) यांनी तिच्यावर कठोर भूमिका घेतली आहे. तसेच नरोत्तम मिश्रा म्हणाले की, अशा प्रकारचे वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही. त्याच दरम्यान तिचं हे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. याबद्दल भोपाळ पोलीस आयुक्तांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून 24 तासात अहवाल देण्यास सांगितले आहे.

 

 

दरम्यान, वेबसिरीज (Webseries) प्रमोशनवेळी सोशल मीडियाशी संवाद साधताना श्वेता म्हणली होती की, “माझ्या ब्राचा आकार देवच घेत आहे.” तिचं हे वक्तव्य अत्यंत अजब असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. त्यामुळे श्वेता पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या जोरदार चर्चेत आली आहे. मात्र याविषयी श्वेताला विचारलं असता तिनं हे वक्तव्य गमतीत केलं होतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. परंतू या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केलाय. तर अनेकांनी तिच्यामुळं भावना दुखावलं गेलं असल्याचं म्हटलंय.

 

 

Web Title : Shweta Tiwari Controversial Statement | shweta tiwari gave controversial statement on her bra size state home minister said will not be tolerated

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे, पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या