धक्कादायक ! अभिनेत्री श्वेता दुसऱ्यांदा घरगुती हिंसाचाराची ‘बळी’, पतीवर गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या डेलिसोपपासून लांब आहे. पण आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चेत असते. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत साकारलेल्या प्रेरणाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या श्वेताने पती अभिनव कोहलीवर छळ करत असल्याचा आरोप केला आहे. अभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे.

श्वेताने यासंबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, पती अभिनवने मुलगी पलक हिला देखील मारहाण केली. यानंतर दोघीही पोलिस ठाण्याबाहेर रडत असल्याचे दिसून आले.

View this post on Instagram

😊 @abhinav.kohli024

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

लैंगिक छळ अंतर्गत गुन्हा दाखल –

श्वेवाने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती अभिनय यांच्या विरोधात आयपीसी कलम ५०४, कलम ५०६, कलम ३५४ ए (लैंगिक छळ) तसेच कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

View this post on Instagram

I am so proud to be your Mom❤️😘 @palaktiwarii

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

श्वेता व पलक अनेक दिवसांपासून अभिनवचे गैरवर्तन सहन करत होत्या. अभिनव पलकला वाट्टेल ते बोलायचा. अचानक त्याने पलकवर हात उचलला त्यानंतर श्वेताने पोलिस स्टेशन गाठले. परंतू अखेर श्वेताने हे प्रकरण आपसी सहमतीने सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. श्वेताने जेव्हा तक्रार दिली त्यानुसार अभिनव मुलगी पलका मोबाइलवर एका मॉडेलचा अश्लिल फोटो दाखत असे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like