73 किलोच्या श्वेता तिवारीनं कसं घटवलं वजन ? पोस्ट शेअर करत सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या चर्चेत आली आहे. श्वेतानं इंस्टाग्रामवरून तिच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीबद्दल सांगितलं आहे. श्वेतानं एक फोटो शेअर केला आहे आणि आपली वेटलॉस जर्नी सांगितली आहे.

श्वेता म्हणते, “एक प्रश्न मला वारंवार विचारलं जात आहे की मी माझ्या डिलिव्हरीनंतर वजन कसं कमी केलं. माझं वजन 73 किलो होतं. हम तुम और देम या वेब सीरीजमध्ये आपल्या रोलमध्ये फिट होण्यासाठी मला वजन कमी करण्याची गरज होती. मी माझ्या न्यू बॉर्न बेबी सोबत बिजी होते. तेव्हा व्यायाम करणं गरजेचं होतं.”

पुढे ती म्हणते, “म्हणूनच मी इमानदारीनं म्हणते की, त्यावेळी एकच अशी गोष्ट होती ज्यानं 10 किलो वजन कमी करायला मला मदत झाली. ती होती @kskadakia चा डाएट.”

श्वेता सांगते, “हा डाएट खूप फायदेशीर आहे आणि खूप मजेदार आहे. मला माझ्या डाएटचा कंटाळा येत नाही. मी नेहमीच माझ्या पुढच्या मीलच्या प्रतिक्षेत असते. नाही, ही प्रमोशनल पोस्ट अजिबात नाही. ही त्या प्रश्नांची उत्तरं आहेत जी मला रोज विचारली जातात.”

श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती हम तुम और देम या वेब सीरीजमध्ये दिसली होती. या सीरीजमध्ये तिनं लिपलॉक किसींग सीनसोबत अनेक बोल्ड सीन दिले होते. याशिवाय सध्या ती मेरे डॅड की दुल्हन या मालिकेत काम करत आहे.