पलकला ‘वाईट’ नजरेने पहातो अभिनेत्री श्वेताचा पती अभिनव, राजा चौधरीचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचा पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले आहेत. त्यानुसार कोहलीला रविवारी (ता.११) अटक करण्यात आली असून सोमवारी (ता.१२) न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता त्याला जामीनही मिळाल्याचे कळत आहे. श्वेताच्या संसारिक आयुष्यात गेल्या अनेक दिवसांपासून उलथापालथ होत आहेत. कोहलीशी झालेल्या या विवादानंतर तिचा पहिला पती राजा चौधरीशी माध्यमांनी संवाद साधला. राजा चौधरी हे भोजपुरी अभिनेता आहेत.

shweta-tiwari

तो म्हणाला, श्वेता आणि तो २००७ मध्ये अधिकृतपणे वेगळे झाले. त्यानंतर त्याने अनेकदा तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण श्वेताने एकदाही त्याच्या प्रश्नाला सरळ उत्तर दिले नाही. की त्याच्या एकाही मेसेजला उत्तर दिले नाही. त्यांची मुलगी पलक हिलाही श्वेताने त्याला भेटू दिले नाही राजा आणि श्वेता वेगळे होण्याआधीही अभिनव तिच्या आयुष्यात होता. तो असा व्यक्ती आहे जो स्वतःच्या स्वार्थासाठी तणावात आणि उदास स्त्रियांना आश्रय देतो.

श्वेतालाही वेगळे होण्यासाठी त्यानेच गाईड केले होते. अभिनवनेच पलकला मला भेटू न देण्याचे सांगितले होते. अभिनवशी लग्न करण्याच्या तिचा निर्णयही चुकीचा होता. मात्र कोहलीने नक्कीच अशी काहीतरी चूक केली असणार आहे. ज्यामुळे श्वेता पोलीसांकडे गेली. मी अनेकदा आमचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला पण कोहलीने आमच्यात मतभेद निर्माण केले होते. २०१० श्वेता बिग बॉस शोमध्ये असताना मी पलकला भेटण्यासाठी गेलो असता तो पलकशी गैरव्यवहार करताना तिच्यावर वाईट नजरेने पाहत असताना पाहिले होते. तो तिच्याशी अगदी निर्दयी वागत होता. यावर मी त्याला थप्पडही मारली होती. त्यानंतर श्वेता जेव्हा बाहेर आली तेव्हा त्यांनी सगळा दोष मलाच दिला.

आरोग्यविषयक वृत्त