बॉलिवूडमध्ये ड्रग्स कोणी भरवत नाही, श्वेता त्रिपाठीचे कंगनाला प्रत्युत्तर

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये कोणी तुम्हाला ड्रग्स भरवत नाही, असे म्हणत अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने कंगनावर रणौतवर निशाणा साधला आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या कंगणा प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अलिकडेच तिने बॉलिवूडमधील 99 टक्के कलाकार अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

सध्या काही लोक बॉलिवूडवर खोटे आरोप करत आहेत. 99 टक्के कलाकार ड्रग्स घेतात, अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी निर्मात्यांसोबत झोपावे लागते. असे आरोप केले जात आहेत. मात्र या केवळ अफवा आहेत. मी देखील इतर कलाकारांप्रमाणे मुंबईत आले होते. मी देखील काम मिळवण्यासाठी स्ट्रगल केले. अनेक ठिकाणी रिजेक्शन मिळाली पण कोणीही माझा लैंगिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक प्रकारच्या सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये मी जाते. तिथे अनेक नामांकित कलाकार येतात. पण मी तरी कोणाला ड्रग्स घेताना पाहिले नाही. जर 99 टक्के लोक रोज ड्रग्स घेऊन नशेत राहिले असते तर इतके सुंदर चित्रपट बॉलिवूडमध्ये कधी तयारच झाले नसते. बॉलिवूडमध्ये कोणी जबरदस्तीने ड्रग्स भरवत नाही. ड्रग्सबद्दल बोलायचे झाले तर मुंबईतच नाही तर संपूर्ण देशात ड्रग्स घेतले जाते. त्यामुळे उगाचच केवळ आरोप करण्यासाठी काहीही बोलणे चुकीचे असल्याचे श्वेता त्रिपाठीने म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like