हेमा मालिनींचा अनोखा प्रचार, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात करत आहे. निवडणुकांच्या प्रचाराला मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक वेगवेगळ्या कल्पना लढवत आहेत. उत्तरप्रदेशातील मथुरा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आणि अभिनेत्री हेमा मालिनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. हेमा मालिनी या आपल्या मतदारसंघात अनोख्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. त्यांच्या या अनोख्या प्रचाराचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रविवारी गोवर्धन परिसरात प्रचार करत होत्या. त्यावेली हेमा मालिनींनी एका शेतात गव्हाचे पीक कापणाऱ्या शेतमजूर महिलांची भेट घेतली. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत थोडं कामही केले. या महिलांसोबत काम करतानाचे हे फोटो आहेत. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.

दरम्यान, हेमा मालिनी यांनी २००४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या २००३ ते २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्य होत्या. तसंच २०१४ लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर यंदा भाजपने पुन्हा एकदा त्यांना भाजपाने मथुरा याच मतदार संघातून रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे हेमा मालिनी यांचा हा प्रचार किती फायद्याचा ठरतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.